Travel e pass maharashtra online registration 2021

Travel e pass maharashtra online registration 2021

Travel e pass maharashtra online registration 2021

आज आपण Travel e pass maharashtra online registration 2021  संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. covid 19 mhpolice या वेबसाईटवर e pass Maharashtra साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येते. सध्या संपूर्ण महाराष्ट्र भर लॉकडाऊन सुरु असून बाहेर जायचे असेल तर ई पास (Travel e pass maharashtra) असणे खूपच आवश्यक आहे त्यामुळे ट्रॅव्हल ई पास महाराष्ट्र या संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

ई पाससाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.

लॉकडाऊनसाठी लागणार travel e pass.

कोरोना जेंव्हा सुरुवातीला आला होता तेंव्हा तो एक आजार होता आता त्याचा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार हा शब्दप्रयोग या ठिकाणी मी यासाठी केला आहे कि अगोदरच लॉकडाऊन कडक झालेले आहे. लोक बेरोजगार होऊन घरामध्ये बसलेले आहेत त्यातच जर तुम्हाला कामासाठी बाहेर जायचे असेल म्हणजेच आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्याची गरज निर्माण होत असेल तर अशावेळी तुम्हाला travel e paas लागणार आहे.

Travel e pass maharashtra

Travel e pass साठी covid 19 mhpolice या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार.

आता travel e pass काढायचा म्हटल्यास कोणी ती मोफत काढून देणार नाही. त्यासाठी तुम्हाला एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जावे लागेल. त्या ठिकाणी थोडेफार पैसे द्यावे लागतील आणि मगच तुम्हाला पास मिळेल. पण मित्रांनो तुम्ही जर खालील व्हिडीओ काळजीपूर्वक बघितला तर नक्कीच तुम्ही Travel e pass maharashtra काढण्यासाठी जो ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्याचा खर्च नक्कीच वाचेल.

travel e pass Maharashtra

मोबाईल वरून काढा travel e pass

मित्रांनो असे काही नाही कि हा travel e pass कॉम्प्युरवरच काढावा लागतो तुमच्याकडे स्मार्ट फोन असेल आणि त्यामध्ये इंटरनेट असेल तर अगदी तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरून travel e pass काढू शकता. मित्रांनो बऱ्याच गोष्ठी अशा असतात ज्या कि आपण आपल्या मोबाईलवरून देखील करू शकतो पण ऑनलाईन शब्द एकला कि लगेच आपल्या डोळ्यासमोर ऑनलाईन सेंटरचे चित्र उभे राहते तर असे काही नसते.

Travel e pass साठी खालील कागदपत्रे लागणार.

आजचा हा travel e pass तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काढू शकता त्यासाठी फक्त हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो travel e pass संदर्भातील हा ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर काही गोष्टी तुमच्याकडे असू द्या. जसे कि ज्या गाडीने तुम्ही प्रवास करणार आहात त्या गाडीचा नंबर त्यानंतर तुमचा फोटो आणि तुम्हाला कोरोना नसल्याबाबतचे मेडिकल सर्टिफिकेट.मित्रांनो डॉक्टरकडून तुम्हाला असे एक मेडिकल सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे. मेडिकल सर्टिफिकेटचा नमुना या ठिकाणी मी तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे.

मेडिकल सर्टिफिकेटचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Travel e pass maharashtra online registration 2021  प्रक्रिया एक एक करत जाणून घेवूयात.

 • तुमच्या मोबाईलमधील ब्राउजर उघडा
 • ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा mhpolice.in
 • Apply For New Pass या निळ्या रंगाच्या बटनाखाली दिसत असलेल्या सूचना वाचून घ्या.
 • Apply For Pass Here या निळ्या रंगांच्या बटनावर क्लिक करा.

Travel e pass ऑनलाईन प्रोसेस समजावून घ्या.

आता या ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात करावी. या ठिकाणी काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्या त्या प्रश्नांची योग्य ती उत्तर त्या समोरील रकान्यामध्ये द्यावीत.

 • तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? असा पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल होय किंवा नाही या पर्यायावर क्लिक करा.
 • जिल्हा पोलीस आयुक्तालय निवडा त्यानंतर तुमचे तुमचे नाव कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत प्रवास करणार आहात ती तारीख या ठिकाणी टाका.
 • प्रवासाचे कारण,वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, इमेल, प्रवास प्रारंभ, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सह प्रवाशांची संख्या, प्रवासाच्या अंतिम ठिकाणाचा पत्ता इत्यादी माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे.
 • त्यानंतर तुम्ही कंटेंट झोनमधील आहात का? असेल तर होय हा पर्याय निवडा नसेल तर नाही हा पर्याय निवडा
 • हि सर्व माहिती भरून झाल्यानंतर आणखी काही पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील जसे कि ड्रायव्हरचे नाव व सह प्रवाशांची संख्या तुम्हाला टाकायची आहे.
 • सर्वात शेवटी माहित टाकायची आहे ती म्हणजे आपण परतीचा प्रवास याच मार्गाने करणार आहात काय? असेल तर होय हा पर्याय निवडा नसेल तर नाही पर्याय निवडा.
 • सर्व माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो आणि तुम्हाला कोरोना नसून प्रवास करण्यासाठी तुम्ही फीट आहात याचे मेडिकल प्रमाण पत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

traval e pass मिळविण्यासाठी एक टोकन आय सांभाळून ठेवा.

सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा. जसे हि तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमचा travel e pass online application सबमिट होईल आणि त्यानंतर तुम्हाला एक टोकन आय मिळेल. हा टोकन आयडी सांभाळून ठेवा कारण चा traval e pass डाउनलोड करण्यासाठी महत्वाची दुवा ठरणार आहे. परत एकदा या वेबसाईटच्या होम पेजवर या. या ठिकाणी डाउनलोड पास असे एक बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा.

असा डाउनलोड करा traval e pass.

जसे हि तुम्ही या बटनावर क्लिक कराल त्यावेळी enter token ID here असा एक रकाना दिसेल. त्या रकान्यामध्ये तुमचा token ID टाकाल त्यावेळी तुमच्या traval e pass संदर्भातील स्टेट्स या ठिकाणी तुम्हाला दिसेल पास मंजूर झाली असेल तर डाउनलोड असे बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करून तुम्ही ती पास तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता किंवा त्या पासची प्रिंट काढू शकता. जर कागदपात्रांच्या कामतरतेमुळे किंवा इतर कारणांमुळे तुमचा अर्ज नामंजूर झाला असेल तर तशी सूचना देखील या ठिकाणी तुम्हाला दिसेल.

शेतकरी अनुदान योजना व शासकीय योजनांची माहिती एका क्लिकवर

विविध शासकीय योजनेच्या माहितीचे व्हिडीओज बघण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी वेबसाईट व विविध माहितीचे व्हिडीओज बघण्यासाठी Digital DG Youtube Channel ला भेट द्या.

विविध शासकीय योजना संदर्भातील खालील लेख सुद्धा वाचा.

जाणून घ्या ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना विषयी

https://digitaldg.in/2021/04/17/ट्रॅक्टर-आमचा-डिझेल-तुमच/

माहिती करून घ्या जीवन प्रकाश योजना काय आहे ते.

https://digitaldg.in/2021/04/15/जीवन-प्रकाश-योजना/

तुम्हाला शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी हवी आहे का. तर मग खालील लेख नक्की वाचा.

https://digitaldg.in/2021/04/11/शेततळे-कागद-अनुदान-योजना/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *