जाणून घेवूयात आजचा हवामानाचा अंदाज. दक्षिण कोकण व मध्यमहाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असला आहे. परंतु मराठवड्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही आणि अशातच हवामान संबधी एक अपडेट आले आहे. ते अपडेट मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय निराशजनक आहे. कारण येणाऱ्या सोमवारपासून संपूर्ण राज्यातील पावसाचा प्रभाव कमी होणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आलेलेल आहे. या हवामान अंदाज अधिक तपशीलवारपणे जाणून घेवूयात.
आजचा हवामानाचा अंदाज पावसाचा जोर होणार कमी
दक्षिण कोकण व मध्यमहाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असलातरी यंदाच्या जून अखेरपर्यंत औरंगाबाद जालना व बीड या तीन जिल्हामध्ये खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत तीन टक्के पेरणी उरकली आहे. शेतातील सर्व कामे उरकली असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाटत पाहत आहेत. चांगला पाऊस पडल्याशिवाय म्हणजेच जमिनीची ओल एक फुट असेपर्यंत पेरणी करू नका असा सल्ला जरी कृषी विभागाने दिला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी १० ते १५ जून दम्यान चांगला पाऊस होईल या अपेक्षेने काही कपाशी व मका पिकाची लागवड केली आहे. ( हा लेख सुद्धा वाचा शेळी पालन योजनेसाठी अर्ज स्वीकारणे सुरु झाले )
विहिरींचा पाणी साठ कमी होत आला. पिकांसाहित माणसांची चिंता वाढली.
हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन विहिरीमध्ये साचवून ठेवलेल्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये मिरची व इतर पिकाची लागवड केली आहे आणि ठिबक सिंचनद्वारे त्या पिकांना जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता विहिरीतील पाणी संपत आले असल्याने सर्वकाही पावसावर अवलंबून आहे. ज्या पिकांची लागवड केली आहे ते पिक हातातून जाते कि काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. विहिरीतील पाणी साठ कमी झाल्यामुळे केवळ पिकांचीच नाही तर माणसांची देखील गैरसोय होत आहे. मानवी वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ( हा लेख सुद्धा वाचा जास्त पावसामुळे किंवा कमी पावसामुळे पिक नुकसान झाले तर असा करा पिक नुकसानभरपाई साठी दावा )
आजचा हवामानाचा अंदाज बघून निराश होऊ नका. शेतकरी बंधुंनो आशावादी राहा.
या वर्षी चांगला पाऊस पडेल या हवामान अंदाजावर अनेक शेतकऱ्यांनी बी बियाणे खते इतर कृषी निविष्ठा खरेदी केलेल्या आहेत. दरवर्षी कोठे कमी तर कोठे जास्त पावसाच्या प्रमाणामुळे काही भागत ओला तर काही भागात कोरडा अशी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो त्यामुळे हवामान अंदाज २०२१ लक्षात घेवून शेतकरी बांधवानी कृषी विभागाच्या दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे. पेरणी योग्य पाऊस झाला तरच पेरणी करावी जेणे करून मोला महागाचे बियाणे वाया जाणार नाहीत. ( हा लेख देखील वाचा बियाणे खत )
शेतकरी बंधुंनो आशावादी राहा.
शेतकरी बांधवांनो आजचा हवामानाचा अंदाज लक्षात घेतल्यास येणाऱ्या सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणजे ज्या भागत जास्त पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी ठरू शकते. परंतु ज्या भागात अजून पाऊसच झाला नाही. पेरणीच झाली नाही. त्या शेतकऱ्यांसाठी हि नक्कीच निराशजनक बातमी आहे. शेतकरी मित्रांनो आजचा हवामानाचा अंदाज बघून निराश होऊ नका काळजी करू नका. सकारात्मक राहा. यावर्षी नक्कीच चांगला पाऊस पडेल आणि शेतकरी बांधवाना भरभरून शेतीचे उत्पन्न मिळेल अशी आशा करूयात.
आमच्याशी सोशल मिडीयावर कनेक्ट व्हा.
शेती संबधित विविध शासकीय योजनांची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या शेतकरी योजना महाराष्ट्र या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. आमच्या फेसबुक ग्रुप व टेलिग्राम ग्रुप मध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकता. शेती संबधित विविध माहितीची व्हिडीओ बघण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनल ला भेट देऊन चॅनल साबस्क्राईब करा.