शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना गवत कापण्यासाठी ५० टक्के अनुदानावर मशीन मिळणार आहे. या योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने केंद्र सहाय्यित राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत वैरण व पशुखाद्य या उप अभियानांतर्गत गवताचे गठ्ठे तयार करण्याच्या मशीनचे ५० टक्के अनुदानावर वितरण. म्हणजेच ( जनजाती क्षेत्र उप योजना ) या योजनेसाठी नवीन लेखशीर्षास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत या योजनेसाठी ५० टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून मिळणार आहे. ( हा लेख देखील वाचा शेळी गट वाटप योजनेसाठी अर्ज स्वीकारणे सुरु ) या संदर्भातील शासन निर्णय दिनांक २३ जून २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
शेतकरी बांधवांनी राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचा लाभ घ्यावा.
राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मिळणाऱ्या या अनुदानाचा शेतकरी बांधवानी लाभ घ्याव. अनेक शेतकरी बांधव शेती व्यवसाय करत असताना त्यासोबत जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करत असतात. सोबतच शेतीच्या कामासाठी गुरे देखील असतात. तर अशा या गुरांना वैरण कापण्यासाठी विळा किंवा इतर पारंपारिक अवजारे वापरली जातात त्यामुळे शेतकरी बांधवांचा वेळ वाया तर वाया जातोच शिवाय यासाठी कष्ट देखील भरपूर करावे लागते. अशावेळी राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेमुळे शेतकऱ्यांना गुरांसाठी वैरण कापण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मशीनसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पशुधन अभियान हि योजना शेतकरी बांधवांना लाभदायी ठरणार आहे. ( हा लेख पण वाचा प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी असा करा ऑनलाईन कर्जासाठी अर्ज )
शेतीसाठी जोडधंदा हवाच.
शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. थोडी इतरही माहिती लक्षात घ्या. शेती करत असतंना केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीसोबतच जोडधंदा सुद्धा करायला पाहिजे. नैसर्गिक आप्पातीमुळे शेतीमध्ये नुकसान झाल्यास शेतीपूरक व्यवसाय असेल तर त्यमुळे तग धरण्यास शेतकरी बांधवांना मदत होऊ शकते. त्यामुळे शेळी पालन व्यवसाय किंवा कुक्कुटपालन व्यवसाय शेतकरी करू शकतात. त्याच बरोबरीने गाई म्हशी घेवून दुग्ध व्यवसाय देखील सुरु करू शकता. ( पुढील लेख पण वाचा दुध प्रक्रिया उद्योग किंवा दुधासंबधित व जनावरांसंबधित उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज मिळवा असा करा ऑनलाईन अर्ज. )
पशुसंवर्धन विभागांच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
शेतीपूरक जोडधंदा करण्यासाठी तुम्ही जर शासकीय अनुदानाची मदत घेऊ इच्छित असल तर तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागास भेट द्या. पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सुरु असतात या योजनांची माहिती घेवून अर्ज केल्यास तुम्हाला या शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील या योजनांची माहिती असते. (पशुसंवर्धन विभागांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. )
तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात राष्ट्रीय पशुधन अभियानसंबधी संपूर्ण माहिती मिळेल.
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या अधिक माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयातील अधिकारी साहेबांना या संदर्भात माहिती विचारू शकता. शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सुरु असतात पण काही शेतकरी बांधवाना या योजनेची माहिती नसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आमच्या फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हा. शेती संबधित विविध शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी तुम्ही आमच्या टेलीग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये देखल सामील होऊ शकता. शासकीय योजनांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज कसे भरले जातात, या संदर्भातील व्हिडीओज बघण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या, त्यासाठी येथे टच करा.
Good mission
Gay anudan
Sheli palan cutter machine
Maahin
Mashin
Seli paln