डिजिटल सात बारा तुमच्या मोबाईलवरअसा डाउनलोड करा

डिजिटल सात बारा तुमच्या मोबाईलवरअसा डाउनलोड करा

आजच्या या लेखामध्ये डिजिटल सात बारा कसा डाउनलोड करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर डिजिटल सात बारा म्हणजे काय हे समजावून घेवूयात. मित्रांनो तुम्ही जर महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर गेलात तर या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारचे सात बारा व ८ अ उतारे बघू शकतात. पहिला आहे विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ . दुसरा आहे digitally signed 7/12 या दोन्ही मधला फरक या ठिकाणी बघुयात. ( हा लेख देखील वाचा शेळी गट वाटप योजनेचे अर्ज स्वीकारणे सुरु लवकर करा तुमचा अर्ज सादर )

विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ

बऱ्याच वेळेस आपण महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर जाऊन विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ बघतो. जिल्हा निवडला, तालुका निवडला, गाव निवडले, गट क्रमांक टाकले कि लगेच पटकन हा सातबारा किंवा नमुना नंबर ८ अ आपल्याला बघावयास मिळतो. पण जर का तुम्ही बारकाईने या 7/12 चे निरीक्षण केले तर लाल रंगामध्ये एक स्पष्ट सूचना दिलेली असते कि सदरील सात बारा हा शासकीय कामासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे ह्या 7/12 व 8 अ चा शासकीय कामासाठी आपल्याला उपयोग करता येत नाही. या 7/12 चा उपयोग केवळ माहिती मिळविण्यासाठी आपण करू शकतो. ( हा लेख पण वाचा प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी मिळणार कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज )

डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 )

विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ सात बारा व ८ अ च्या तुलनेत डिजिटल सात बारा म्हणजेच digitally signed 7/12 खूप उपयोगी असतो. हा सातबारा मिळविण्यासाठी नोंदणी करून लॉगइन आय. डी. आणि पासवर्ड मिळवावा लागतो. १५ पेमेंट केल्यानंतरच हा सातबारा मिळतो. या ७/१२ वर क्यू आर कोड असतो. हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीत केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही अशी सूचना देखील या सात बारावर असते. ( पुढील लेख सुद्धा वाचा दुध प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज मिळवा असा करा ऑनलाईन अर्ज. )

डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 ) मिळविण्यासाठी नोंदणी करा.

शेतकरी बंधुंनो खाली काही स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या स्टेप्स बघून तुम्ही हा सात बारा काढू शकता. सात बारा डाउनलोड करण्यासाठी अगोदर नोंदणी करावी लागते ती क्रिया या ठिकाणी समजून घेवूयात.

  • तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबईलमधील ब्राउजर उघडा
  • त्यामध्ये https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr हा web adress टाका
  • एंटर बटन दाबल्यानंतर digitally signed 7/12 व 8 अची महाराष्ट्र शासनाची वेबसाईट तुमच्या तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.
  • स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसत असलेल्या चौकटीमध्ये लॉगीन आयडी, पासवर्ड टाकून आणि कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.
  • तुम्ही नवीन युजर असाल तर लॉगीन या बटनाच्या खाली दिसणाऱ्या New User registration या बटनावर क्लिक करा किंवा टच करा.
  • नोंदणी करून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवा. ( नवीन नोंदणी कशी करावी या संदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. )
डिजिटल सात बारा 2021

खात्यामध्ये पैसे जमा करा

  • लॉगीन केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करा.
  • पैसे जमा करण्यासाठी Recharge Account या बटनावर क्लिक करा.
  • १५ रुपये ते १००० रुपयापर्यंत जेवढी रक्कम तुम्हाला टाकायची असेल तेवढी तुम्ही टाकू शकता.
  • रकमेचा आकडा टाकल्यानंतर पे नाऊ ( Pay Now ) या बटनावर क्लिक करा.
  • रिफंड पोलिसीसमोरील बटनावर टिक करा
  • कन्फर्म या बटनावर क्लिक किंवा टच करा.
  • जसे हि तुम्ही कन्फर्म या बटनावर क्लिक कराल त्यावेळी पेमेंट करण्याचे अनेक पर्याय तुम्हाला दिसेल त्यापैकी योग्य तो पर्याय निवडा.
  • पेमेंटचा पर्याय निवडून तुमच्या डिजिटल सात बारा खात्यामध्ये पैसे जमा करा.
  • पेमेंट यशस्वी झाल्यानंतर Bank Reference ID व Payment ID सांभाळून ठेवा किंवा प्रिंट काढून घ्या.

असा करा डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 ) डाउनलोड

  • खात्यामध्ये पुरेसे पैसे जमा झाल्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा, सर्वे नंबर टाका
  • वरील सर्व माहिती टाकल्यानंतर डाउनलोड या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही डाउनलोड या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या खात्यामधून डिजिटल सातबारा किंवा डिजिटल नमुना नंबर ८ साठी प्रत्येकी १५ रुपये एवढी रक्कम कपात केली जाईल जी कधीही रिफंड होणार नाही.

डिजिटल सात बारा अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 ) नमुना डाउनलोड करा.

अशा प्रकारे तुम्ही डिजिटल सात बारा (digitally signed 7/12 ) डाउनलोड करू शकता आणि प्रिंट काढून शासकीय कामासाठी देवू शकता अशी सूचना या सातबाऱ्यावर तुम्हाला वाचण्यास मिळेल. या सातबाऱ्यावर क्यू आर कोड देखील असतो. हा सातबारा कसा असतो हे जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा आणि नमुना बघून घ्या.

डिजिटल-सातबारा.pdf (1499 downloads )

विविध शासकीय योजनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या WhatsApp Group तसेच फेसबुक ग्रुपटेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *