पिक विमा भरण्यासाठी पिक पेरा फॉर्म pdf मध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पिक पेरा स्वयं घोषणा पत्र pmfby या वेबसाईटवर पिक विमा ऑनलाईन अर्ज भरतांना अपलोड करावे लागते.
त्यामुळे हा पिक पेरा अर्ज तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि तुमचा पिक विमा अर्ज सादर करून द्या. या लेखाच्या सर्वात शेवटी पिक पेरा फॉर्म pdf असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता.
विमा अर्ज भरण्यासाठी पिक पेरा प्रमाणपत्र आवश्यक, पिक पेरा फॉर्म pdf उपलब्ध.
शेतामधील पिक कमी पावसामुळे किंवा जास्त पावसामुळे नष्ट झाले तर शेतकरी बांधवांना यासाठी पिक विमा कंपनीकडून नुकसाभरपाई मिळते. त्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकांचा पिक विमा काढून घेणे गरजेचे असते.
त्यामुळेच या ठिकाणी आपण पिक पेरा प्रमाणपत्र मध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली असते याविषयी जाणून घेणार आहोत. ( पुढील लेख पण वाचा शेती संबधी व्यवसाय उभारणीसाठी मिळणार १० लाखापर्यंत कर्ज )
पिक पेरा स्वयं घोषणा पत्रामध्ये खालील माहिती लिहणे अपेक्षित आहे.
- अर्जदार म्हणजेच शेतकरी बांधवांचे पूर्ण नाव लिहावे.
- अर्जदाराचे नाव, गाव जिल्हा व संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाकावा.
- अर्जदाराने आपल्या शेतीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर लिहावा.
- अर्जदाराची शेती कोणत्या गावात आहे याविषयी माहिती द्यावी.
- अर्जदाराने पेरलेल्या पिकांची माहिती टाकावी.
- अर्जदाराने म्हणजेच शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतात ज्या दिवशी पेरणी केली त्या दिवसाचा दिनांक टाकावा.
- पेरणी किती क्षेत्रामध्ये केली ते हेक्टर व आर या परिमाणामध्ये टाकावी.
पिक पेरा स्वयं घोषणा पत्र म्हणजेच पीक पेरा डाउनलोड करा.
शासकीय योजना संबधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्ट व्हा.
पिक पेरा स्वयं घोषणा पत्रामध्ये हि सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर Pradhan Mantri Fasal Bima Yojana PMFBY या वेबसाईटवर ऑनलाईन पिक विमा अर्ज भरतांना हा अर्ज इतर कागदपत्रांसोबत अपलोड करावा लागणार आहे.
शेती विषयी विविध योजना संबधी शासकीय योजना संबधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिजिटल डीजी चॅनल ला भेट द्या. शेतकरी अनुदान योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मोफत मिळविण्यासाठी आमच्या WhatsApp Gruops व फेसबुक ग्रुप तसेच टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हा.
weather base cha pik phera upload kara sir
नक्की