पशु संवर्धन योजना संदर्भात जाणून घेवूयात. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अंतर्गत फिरता पशु वैदकीय दवाखाना संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी पशु संवर्धन विभागाच्या विविध योजना सुरु असतात. त्या योजनांची आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात किंवा दुग्धव्यवसाय करतात त्यांना या योजनेचा खूप लाभ होऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी बांधवांकडे गाई, म्हशी आणि शेळ्या असतात त्याचप्रमाणे शेती कामासाठी गुरे देखील असतात. जनावरे आजारी पडली कि मग शेतकऱ्यांची खूप परवड होते त्यामुळे हा उपक्रम जाणून घेणे खूप महत्वाचे ठरणार आहे. ( पुढील लेख पण वाचा शेळीपालन गट वाटप योजनेसाठी अर्ज भरणे सरू )
पशुपालकांसाठी अत्यंत उपयोगी हि पशु संवर्धन योजना
महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी भारत फायनान्स इंक्लूजन लिमिटेड या कंपनीचे कॉल सेंटर देखील सुरु करण्यात आलेले आहेत. तुमच्याकडे शेळ्या, मेंढ्या, दुधाळ जनावरे किंवा इतर जनावरे असतील आणि ते आजारी पडले तर अशा वेळी तुम्ही १९६२ फोन करताच कमीत कमी वेळात पशुपालकांस दर्जेदार पशुवैदकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ( हा लेख पण वाचा शेळीपालन व्यवसायासाठी मिळणार जास्त अनुदान )
शेळी पालन व्यवसाय किंवा दुग्धव्यवसाय करत असाल तर या पशु संवर्धन योजनेचा लाभ घ्या.
बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे अनेक तरुण शेळीपालन व्यवसाय, दुग्धव्यवसाय व शेतीपूरक व्यवसाय करतांना दिसत आहेत. शेळी पालन व्यवसाय किंवा दुग्धव्यवसाय करत असतांना सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गुरांचे आजार होय. दुग्धव्यवसाय किंवा शेळी पालन व्यवसाय करत असताना आजारामुळे एखादे जनावर दगावले तर शेतकरी बांधवांना खूप मोठे नुकसान होते. जवळ पशुवैद्यकीय असेल तर उत्तम पण जर दवाखाना नसेल तर मात्र शेतकऱ्याची खूप कुचंबना होते. त्यामुळे पशु संवर्धन विभागाची हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. ( पुढील लेख पण वाचा जाणून घ्या तुमच्या तालुक्यातील कोणकोणत्या व्यक्तींना शेळी अनुदान मिळाले )
जनावरांच्या औषधोपचारासाठीचा अतिरिक्त खर्च वाचणार
शेतकरी आपल्या जनावरांवर जीवापाड प्रेम करत असतो किंबहुना दावणीतील जनावरांना तो कुटुंबातील सदस्यच मानत असतो. जनावरे आजारी पडली कि शेतकऱ्यांची खूप परवड होते. उपचारासाठी जनावरांना गावापासून दूर असलेल्या पशुवैदकीय दवाखान्यात घेवून जावे लागते. कधी तर खाजगी डॉक्टरांना घरी बोलवावे लागते अशा वेळी घरापर्यंत पशुवैदकीय सुविधा दिल्यामुळे शेतकरी बांधवांना जास्त खर्च करावा लागतो. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेमुळे जनावरांवर होणारा अतिरिक्त खर्च वाचणार असून मोफत दारापर्यंत सुविधा मिळणार आहे. ( शेती पूरक उद्योग करण्यास मिळणार कर्ज )
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना संदर्भातील अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबरवर फोन लावा.
अनेक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु झालेली आहे. पण कदाचित काही जिल्ह्यांच्या काही तालुक्यामध्ये अजून देखील हि योजना प्रभावीपणे सुरु झालेली नाही त्यामुळे तुम्ही ज्या तालुक्यातील असाल त्या तालुक्यामध्ये पशु संवर्धन विभागाची मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु झाली आहे का या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी १९६२ या टोल फ्री नंबरवर फोन लावून विचारून घ्या आणि पशु संवर्धन योजनेचा लाभ घ्या.
पशु संवर्धन योजना व इतर विविध योजनांविषयी माहिती मिळविण्यासाठी आमच्याशी जोडा.
पशु संवर्धन विभागच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. विविध शासकीय योजनेच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुप WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा. विविध शासकीय योजनांचे अर्ज कसे भरावेत या संदर्भातील माहितीसाठी डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या.