कुक्कुटपालन पालन योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेती करत असतांना शेतकरी बांधवाना शेतीमध्ये नैसर्गिक संकटाचे अनेक धोके पत्करावे लागतात. शेती व्यवसायामध्ये केवळ शेतीवर अवलंबून राहिल्यास अधिक तोटा होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतीला काहीतरी जोड धंदा असणे आवश्यक आहे. शेतकरी बंधुंनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पूरक व्यवसाय करू इच्छित असाल तर शासकीय अनुदानावर आधारित कुक्कुटपालन पालन योजनेचा लाभ घ्या. ( हा लेख पण वाचा जिल्हा परिषद योजनेअंतर्गत शेळी गट वाटप योजनेचे अर्ज सुरु. )
खालील कार्यक्षेत्रामध्ये हि कुक्कुटपालन पालन योजना लागू आहे.
शेतकरी बंधुंनो, आदिवासी विकास विभागामार्फत, आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, राजूर, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, शहापूर आणि पेण या कार्यक्षेत्रातील आदिवासींच्या स्वयंसहायता बचत गटांसाठी एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसायासाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्दीष्टाने ही कुक्कुटपालन पालन योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी या भागातील आदिवासी बचत गटांनी या योजनेसाठी अर्ज करावे असे आह्वान करण्यात आले आहे. ( पुढील योजनेचा पण लाभ घ्या. उद्योग व्यवसाय चालुक करण्यासाठी मिळणार १० लाखापर्यंत अनुदान असा करा अर्ज )
कुक्कुटपालन पालन योजना बचत गटांचे निकष काय आहेत ते जाणून घ्या.
मित्रांनो एकात्मिक कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांचे निकष खालील प्रमाणे आहेत. १) बचत गटातील सर्व सदस्य अनुसूचित जमातीचे असायला हवेत २) जे बचत गट या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत त्या बचत गटांचा बँकेत व्यवहार चालू असावा. ३) शासन निर्णयात नमूद असणारी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि बचत गटातील सर्व सदस्यांचे रजिस्टर हमीपत्र हे पूर्ण असावेत.
एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी किती निधी मिळणार जाणून घ्या.
शेतकरी बंधुंनो एकात्मिक कुक्कुटपालन योजनेद्वारे जे पात्र बचत गट असतील त्यांना शेड बांधकामासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे त्यासोबतच छोटे पक्षी, पशु खाद्य व आवश्यक साहित्य देखील पुरविले जाणार आहे. कुक्कुटपालन पालन योजना अंतर्गत प्रत्येक लाभार्थी बचत गटाला 5.25 लाख रुपये शासकीय अनुदान मिळणार आहे. त्यासोबतच पक्ष्यांच्या लसीकरण, संगोपन तसेच कुक्कुटपालन व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. हि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायातील नामांकित कंपन्यांसोबत करार पद्धतीने योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालये यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. ( या योजनेचा पण लाभ घ्या शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज )
कुक्कुटपालन पालन योजना फायद्याची रोजगाराच्या संधी निर्माण होणार
मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या बेरोजगारीवर मात करण्यासाठी शेतकरी पुत्रांना शेती पूरक व्यवसाय करणे खूपच आवश्यक आहे. मित्रांनो एकात्मिक कुक्कुटपालन करून ग्रामीण भागातील तरुण वर्ग स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. चिकन व अंडी यांना सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे त्यामुळे जर तरुण वर्ग कुक्कुटपालन पालन व्यवसायाकडे वळला तर नक्कीच त्यांना या योजनेमुळे रोजगार निर्माण होणार आहे.
Namaskar sar Latur Jilla Sathi kukutpalan acche anudan aahe ka mela kukut Palan vyavsay karaycha aahe Teri Mala margdarshan karave
माहिती वाचून घ्या….