या लेखामध्ये महाडीबीटी बिल अपलोड करण्याची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाडीबीटी वेबसाईटवर अनेक शेतकरी बांधवांनी विविध योजनांसाठी अर्ज भरलेले आहेत. त्यांची निवड देखील झालेली आहे. परंतु अनेक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर बिल अपलोड केली आहेत परंतु ती रिजेक्ट होत आहेत. GST बिल रिजेक्ट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे एक तर ती बिले ब्लर अपलोड करण्यात आलेले आहेत. बिल रिजेक्ट होण्याचे दुसरे कारण म्हणजे फक्त दुकानदाराची स्वाक्षरी आहे. ( पुढील लेख देखील वाचा शेळीपालन गट वाटप योजनेस सरुवात )
महाडीबीटी निवड प्रक्रिया
मित्रांनो महाडीबीटी योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आगोदर अर्ज करावा लागतो. त्यानंतर त्यांची निवड झाली की मग कागदपत्रे अपलोड करावी लागतात. आणि त्यानंतर त्या योजनेचे साहित्य घेण्यासाठी तुम्हाला कृषी विभागाकडून पूर्व संमती मिळते. तुम्ही साहित्य खरेदी केल्यानंतर योग्य ती बिले अपलोड करणे अपेक्षित असते. हे महाडीबीटी बिल वेबसाईटवर अपलोड कसे करावे, कोणत्या व्यक्तींच्या सह्या आवश्यक आहे ही आणि इतर माहिती आपण या याठिकाणी जाणून घेणार आहोत. ( हा लेख पण वाचा शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज )
खालील व्हिडीओ पाहून महाडीबीटी बिल अपलोड करा.
या लेखात दाखवलेल्या महाडीबीटी बिलवार दुकानदाराची,ग्राहकाची,वितरकांची स्वाक्षरी आहे. त्याच बरोबर या बिलावर जीएसटी नंबर चा उल्लेख केलेला आहे. हे परिपूर्ण बिल आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करायचे आहे. शेतकरी बंधुंनो तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल कि महाडीबीटी बिल अपलोड कसे करतात तर या संदर्भातील व्हिडीओ खाली दिलेले आहे तो पाहून सुद्धा तुम्ही तुमचे बिल अपलोड करू शकता.
महाडीबीटी GST बिल अपलोड करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- तुमच्या कम्प्युटरमधील ब्राउजर ओपन करा.
- ब्राउजरमध्ये महाडीबीटी डॉट जीओव्ही डॉट इन हा kayword टाइप करा.
- तुमच्या स्क्रीनवर आपले सरकार महाडीबीटी पोर्टल ओपन होईल.
- या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी दोन पर्याय दिलेले आहेत.
- एक पर्याय म्हणजे युझरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करता येते
- दुसरा पर्याय आधार क्रमांक आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या मोबाईल वर ओटीपी घेऊन त्याद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता.
- जसे तुम्ही तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन कराल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असा एक महाडीबीटी पोर्टलचा डॅशबोर्ड दिसेल.
- डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला वैयक्तिक तपशील, तक्रार सूचना डॅशबोर्ड, मी अर्ज केलेल्या बाबी आणि इतर पर्याय दिसतील.
- या पर्यायपैकी सगळ्यात शेवटी खालून दोन नंबरला असलेला पर्याय म्हणजे कागदपत्रे अपलोड करा या बटणावर क्लिक करा.
- जसे तुम्ही कागदपत्रे अपलोड करा या बटणावर क्लिक कराल त्यानंतर आणखी दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल.
असे करा GST बिल अपलोड
- या ठिकाणी वैयक्तिक कागदपत्रे आणि बिल/देयक असे दोन पर्याय दिसेल
- बिल/देयक या पर्यायावर क्लिक करा.
- ज्या योजनेसाठी शेतकऱ्याने अर्ज केला असेल त्या योजने पुढील कागदपत्रे अपलोड करा या नुल्या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक डॅशबोर्ड ओपन होईल.
- त्या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करा.
- जसे तुम्ही सिलेक्ट डॉक्युमेंट या पर्यायायावर क्लिक कराल. तेव्हा तुम्हाला बिल इनव्हॉईस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- मित्रांनो या ठिकाणी तुम्ही JPG,JPEJ किंवा PDF फॉरमॅट चे डॉक्युमेंट अपलोड करू शकता.
- कमीत कमी पंधरा KB व जास्तीत जास्त पाच MB पर्यंत डॉक्युमेंट अपलोड करू शकता.
- GST बिलाची इनव्हॉईस अमाऊंट दिलेल्या रकान्यामध्ये टाका.
- विक्रेत्याचा जीएसटीआयन क्रमांक टाका.
- जोडा या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही जोडा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी सदर कागदपत्र यशस्वीरीत्या जतन केली असा संदेश तुम्हाला दिसेल.
विविध योजनेचे व्हिडीओज बघा.
अशा पध्दतीने या ठिकाणी शेतकरी महाडीबीटी बिल अपलोड करू शकतात. शेतकरी बंधुनो विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी डिजिटल डीजी या युट्युबचाणालवरील माहितीची व्हिडीओज बघा. विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक ग्रुप, Whatsapp Group, व टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हा.