आज आपण पेरू फळबाग शेती मधून लाखो रुपयांचे उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याची याशोगाधा जाणून घेणार आहोत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या मनामध्ये शेती व्यवसायसंबधी नकारात्मक विचार येत असेल तर हा पेरू फळबाग शेतीचा लेख खास तुमच्यासाठी लिहिलेला आहे. शेती विषयक योजनांची माहिती तर सगळेच शेतकरी घेत असतात. ( खालील व्हिडीओ नक्की पहा )
पेरू फळबाग शेती मध्ये यश हमखास मिळण्याची शक्यता.
एखाद्या शेतकऱ्याने शेतीमध्ये कशाप्रकारे यश मिळविले आहे यशस्वी शेतकऱ्यांची याशोगाधा जर आपण इतर शेतकऱ्यांना दाखविली तर नक्कीच इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळते. शेतीमध्ये देखील यश संपादन करता येते हा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. आज आपण अशा एका शेतकरी बांधवांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी शेतीमध्ये खडकाळ जमिनीमध्ये अत्यंत कमी पाण्यावर पेरू फळबाग शेती यशस्वी करून हे दाखवून दिले आहे कि शेतीसुद्धा फायद्याची होऊ शकते.
फळबाग लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. तुम्हाला जर शासकीय अनुदानावर कोणतीही फळबाग लागवड करायची असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करा. फळबाग अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
पेरू फळबागेच्या संपूर्ण शेतीला केले तारेचे कुंपण.
काहीच नाही जमले तर शेवटचा पर्याय शेती हा विचार आपण जोपर्यंत बदलत नाही तो पर्यंत शेतीविषयीची विचारधारा आपण बदलू शकत नाही. शेतीविषयीची हीच विचारधारा बदलली आहे तो भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील दादाराव सहाने यांनी. शेती करत असतांना शेतीमध्ये वाद विवाद होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शेतीचा बांध होय. शेतीचा बांध जर व्यवस्थित असेल तर वाद टाळता येतात याच बाबीचा विचार करून दादाराव सहाने याने त्यांच्या संपूर्ण पेरू फळबाग शेतीला तारेचे कुंपण केलेले आहे.
आधुनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी केली भ्रमंती.
दादाराव सहाने पारंपारिक पद्धतीने शेतीमध्ये पिकांची लागवड करत असे. पारंपारिक पद्धतीने घेतलेल्या पिकांना बाजरभाव कमी मिळत असे शिवाय त्यावर खर्च देखील जास्त होत असे. त्यामुळे शेती व्यवसाय जर नफ्यात आणायचा असेल तर चाकोरीबाहेरचा विचार करायला हवा हि भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यांनी बाजारामध्ये जे विकतय तेच पिकवायचे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी शेतीचा अभ्यास करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भ्रमंती देखील केली. विविध ठिकाणी भ्रमंती केल्यावर त्यांच्या लक्षात आले कि पारंपारिक पिके बदलून फळबागेकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे.
पेरू फळबाग शेती वाचविण्यासाठी शेतात शेततळे खोदून पाणी टंचाईवर केली मात.
मित्रांनो कोणत्याही गोष्टीचे प्लानिंग करणे सोपे असते परंतु जेंव्हा प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात होते त्यावेळेस अंत्यत अडचणींना सामोरे जावे लागते. दादाराव सहाने यांना देखील पेरू फळबाग शेती जागविण्यासाठी सगळ्यात मोठी अडचण निर्माण झाली होती ती म्हणजे पाणी होय. शेतातील पेरूची फळबाग जागविण्यासाठी त्यांनी त्यांच्या शेतातच शेततळे खोदले. इच्छा तेथे मार्ग या म्हणीप्रमाणे त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला.
नोकरी पेक्षा व्यवसाय केंव्हाही चांगला.
प्रत्येकालाच वाटते कि चांगली नोकरी असावी, फिरण्यासाठी कार असावी, शहराच्या ठिकाणी छान घर असावे अर्थात यामध्ये चुकीचे असे काहीच नाही. किंबहुना स्वप्ने मोठीच बघावीत मात्र केवळ नोकरीच पाहिजे हाच जर तुमचा हट्ट असेल तर तो चुकीचा आहे. नोकरी मिळत असेल तर नक्की करा पण अनेक प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर शेतीविषयी सकारत्मक विचार करा. कारण चांगली शेती जर केली तर नोकरी एवढे किंबहुना नोकरीपेक्षाहि जास्त उत्पन्न शेतीमध्ये मिळणे शक्य आहे.
दादाराव सहाने यांच्या पेरू फळबाग शेतीमुळे इतर शेतकऱ्यांना देखील मिळते प्रेरणा.
शेतकरी बंधुंनो बदल हा हळूहळू होत असतो. दादाराव सहाने यांनी त्यांच्या शेतीमध्ये केलेल्या बदलामुळे त्यांच्या परिसरातील अनेक शेतकरी प्रभावित झालेले आहेत. आता इतर शेतकरी देखील पारंपारिक पिकांच्या ऐवजी विकेल ते पिकेल हे धोरण अंगीकरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मित्र देखील आता फळबागेकडे वळण्याच्या तयारीत आहेत.
सोशल मिडीयावर आम्हाला फॉलो करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. आमच्या वेबसाईटवर नवीन असाल तर इमेल न्यूजलेटर सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या. विविध माहितीचे व्हिडीओज बघण्यासाठी येथे क्लिक करा. योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सॲप ग्रुप व टेलिग्राम चॅनल मध्ये सामील व्हा.