मित्रांनो रेशन धान्य दुकानामध्ये आता अधिक सुविधा मिळणार आहेत. या सुविधा कोणकोणत्या असणार आहेत त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. जवळपास सर्वच गावामध्ये स्वस्त हे स्वस्त दुकान असते. या स्वस्त धान्य दुकानात शासनाकडून गावातील ग्रामस्थांना स्वस्त धान्य मिळत असते. याशिवाय इतरही सुविधा नागरिकांना मिळत असतात.
एकाच छताखाली रेशन धान्य दुकानामध्ये अनेक सुविधा
आता नो राशन धान्य दुकानात म्हणजेच राशान दुकानात आणखी नवीन सुविधा नागरिकांना मिळणार आहे त्यामुळे एकाच छताखाली अनेक सुविधा मिळणार असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय थांबणार आहे. त्यामुळे आता जेंव्हा तुम्ही रेशन दुकानामध्ये म्हणजेच स्वस्त धान्य दुकानामध्ये जाल त्यावेळी हि बाब तुमच्या लक्षात असू द्या. राशन दुकानामध्ये कोणकोणत्या सुविधा यापुढे मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
रेशन धान्य दुकानामध्ये आता खालील नवीन सुविधा मिळणार.
- स्वस्त धान्य दुकानातून अन्य सुविधांची बिले भरण्याची सोय उपलब्ध.
- पॅन कार्ड मिळू शकेल आता रेशन धान्य दुकानामध्ये
- पासपोर्टचे अर्ज दखल करण्यास परवानगी
- निवडणूक आयोगाशी संबधित सेवा देखील सुरु होणार.
तर मित्रांनो अशा पद्धतीने स्वस्त धान्य दुकानामध्ये नवीन सेवा सुरु होणार आहेत. या सेवांचा जरूर लाभ घ्या.
नागरिकांचा त्रास कमी होणार. स्वस्त धान्य दुकानदारांना मिळेल नवीन व्यवसाय करण्याची संधी.
नो रेशन धान्य दुकानात वरील प्रमाणे सुविधा मिळणार आहेत कारण केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालय व सीएससी ई गव्हर्नन्स इंडिया लिमिटेडमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. राशन दुकानामधून राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य पुरवठा केला जातो. या योजनेत ८०,००० कुटुंबाना सामावून घेतले गेले असल्याने या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. नागरिकांना तर नवीन सेवा मिळेलच परंतु स्वस्त धान्य दुकानदारांना देखील नवीन व्यवसाय करण्याची संधी मिळेल.
विविध शासकीय योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर
सर्व सामान्य जनतेसाठी शासनाच्या विविध योजना सुरु असतात परंतु त्या योजनांची माहिती अनेक नागरिकांना नसण्याची शक्यता असते. शेती संबधित विविध योजना व इतर विषयांवरील मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या खालील सोशल नेटवर्किंगशी जोडा.