आनंदाची बातमी, ट्रैक्टर योजना अनुदान नवीन GR नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने हा ट्रॅक्टर योजना संदर्भातील शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन २०२१ २२ मध्ये राबविण्यासाठी रुपये ९ हजार लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आलेली आहे. ( ट्रॅक्टर योजना संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा. )
जाणून घ्या कसा आहे ट्रैक्टर योजना अनुदान नवीन GR
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकीकरण योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सादर योजनेअंतर्गत केंद्रशासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातील घटक क्रमांक – 3, वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे/ यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजारे व यंत्रे बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी करण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. सादर घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करायची आहे.
हा ट्रैक्टर योजना अनुदान नवीन GR बघा. जाणून घ्या किती निधी मिळणार.
ट्रैक्टर योजना अनुदान नवीन GR डाउनलोड करण्यासाठी खालील GR डाउनलोड करा या बटनावर क्लिक करा. योजनेसाठी सन २०२१ ते २२ या वर्षात रुपये १५ हजार लक्ष तरतूद करण्यात आली होती तथापि वित्तविभागाच्या दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार ७ टक्केच्या मर्यादेत रुपये ९ लक्ष सुधारित तरदूत करण्यात आली आहे. सदर सुधारित तरतुदी नुसार रुपये ९ हजार लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्याव विचाराधीन होता.
कसा आहे हा शासन निर्णय
- सन २०२१ व २२ या वर्षात राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुपये ९ हजार लक्ष रकमेच्या कार्यक्रमास या निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
- या योजने अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती/जमाती महिला, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ५० टक्के किंवा रुपये १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के किंवा रुपये १ लाख या पैकी जे कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
- इतर बाबींसाठी योजनेची अमलबजावणी करतांना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे संदर्भाधीन दिनांक १२ सप्टेंबर २०१८ या शासन निर्यामधील अटी व शर्थीचे काटेकोकोरपणे पालन करावे.
- लाभार्थींना ट्रॅक्टर योजनेचा लाभ देताना संबधित योजनेसंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- ट्रॅक्टर योजनेची अमलबजावणी करतांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महिला शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व शेतकरी यांच्यासाठी भौतिक किंवा आर्थिक लक्षांक निर्धारित करावा.
मोबाईलवरून असा करा ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज
मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी तुमची तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो अनेक जणांना प्रश्न पडला असेल कि महाडीबीटी योजनेचा अर्ज मोबाईलवरून करता येईल का ? तर हो मित्रांनो तुम्ही हा अर्ज अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज मोबाईलवरून कसा करा या माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा खालील व्हिडीओ पहा.
कॉम्प्यूटर वरून असा करा ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
- तुमच्या कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा mahadbt farmer login.
- वरील शब्द किंवा कीवर्ड टाकल्यावर महाडीबीटी योजनेची एक लिंक येईल त्यावर क्लिक करा.
- महाडीबीटी वेब पोर्टल ओपन झाल्यावर लॉगीन करा.
- लॉगीन करण्यासाठी दोन पर्याय तुम्हाला दिसेल १) युजर आयडी आणि पासवर्ड टाकून किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉगीन करू शकता.
- तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी आवशयक नोदणी या पर्यायावर क्लिक करा.
नोंदणी करण्यासाठी आवशयक पात्रांची यादी.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड ( असेल तर )
- बँक पासबुक
- सातबारा
- ८ अ
कागदपात्रांची पूर्तता केल्यानंतर असा करा ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज.
- युजर आयडी आणि पासवर्ड टाकून किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉगीन करा.
- अर्ज करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
- आवश्यक असलेली माहिती भरा.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.
- अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा किंवा येथे क्लिक करा.