तुम्हाला तुमचे स्वतःचे घर हवे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण म्हाडा पुणे लॉटरी अंतर्गत घरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हणजेच, पुणे म्हाडाच्या 4222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
म्हाडा पुणे लॉटरी सदनिकांचा तपशील खालीलप्रमाणे
- पंतप्रधान आवास योजना – १५ सदनिका
- म्हाडा गृहनिर्माण योजना – ४४ सदनिका
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २८५५ सदनिका
- २० टक्के सर्वसमावेशक गृहयोजना अंतर्गत पुणे मनपा हद्दीत ७१९ सदनिका तर पिंपरी चिंचवड हद्दीत ५८९ सदनिका.
म्हाडा पुणे लॉटरी अंतर्गत पुण्यामध्ये घर घेण्याची नामी संधी.
पुण्यामध्ये आपले देखील स्वतःचे चांगले घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु आर्थिक अडचणीमुळे स्वतःच्या घराची स्वप्न पूर्ती होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला पुण्यामध्ये घर घेण्याची म्हाडा पुणे लॉटरी अंतर्गत नामी संधी चालून आलेली आहे. पुणे म्हाडाच्या 4222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज करून द्या.
पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्यातल्या ४२२२ घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज
म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्यातल्या ४२२२ घरांच्या म्हाडा पुणे लॉटरी अंतर्गत ऑनलाईन अर्ज नोंदणीस दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ सुरुवात झाली आहे. जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात ही म्हाडा पुणे लॉटरी निघणार आहे. पुणे म्हाडाची जानेवारी २०२२-ऑनलाईन सोडत योजना राज्यातल्या अनेक गरजूंना पुण्यासारख्या सिटीमध्ये स्वस्त घर घेण्याची संधी निर्माण करून देत आहे.
घरांसाठी ऑनलाईन अर्ज वेळापत्रक
- ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्जाची सुरुवात – १६/११/२०२१ सकाळी ९ वा.
- अर्ज नोंदणीची शेवटची तारीख व वेळ – १६/१२/२०२१ सायंकाळी ५ वा.
- लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख व वेळ – १६/१२/२०२१ रात्री ११.५९ वा.
- ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची शेवटचा दिनांक – १७/१२/२०२१ रात्री ०९ वा.
- बँकेत अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख – २०/१२/२०२१ बँकेच्या कार्यालयीन वेळेत.
- सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादींची प्रसिद्धी – २८/१२/२०२१ सायंकाळी ६ वा.
- स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी – ०४/०१/२०२२. सकाळी १० वा.
- लॉटरी म्हणजेच सोडत दिनांक ७/०१/२०२२ सकाळी १० वा.
- सोडतीतील यशस्वी व पतीक्षा यादीमधील अर्जदारांची नावे म्हाडाच्या वेबसाईटवर प्रकाशित करणे ७/०१/२०२२ सायंकाळी ६ वा.
- सोडतीचे स्थळ गृहनिर्माण भवन आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे.
योजनेचे नाव | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे |
घरांची संख्या | ४२२२ |
योजनेसाठी निवड | लॉटरी पद्धत. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन. |
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | म्हाडा |
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक | १६ डिसेंबर २०२१ |