मंत्रालयातून महाआवास अभियान ग्रामीण टप्पा-2 चा शुभारंभ आज राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. महाआवास अभियान ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत राज्यातील्ज गोरगरीब जनतेस ५ लाख पक्की घरे बधून मिळणार आहेत. त्याच प्रमाणे हि जी घरे बांधली जाणार आहेत त्याचा कालावधी हा १ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल. या योजनेसंदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.
महाआवास अभियान ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत झालेई कामे
- १२०० पेक्षा जास्त बहुमजली बिल्डीं.
- ६३० पेक्षा जास्त गृहसंकुलाचे बांधकाम.
- ७५० घरकुले मार्ट.
- ५०११२ भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून दिलेली आहे.
वरील प्रमाणे महाआवास अभियान ग्रामीण टप्पा १ मध्ये घरे बांधण्यात आल्याची माहिती शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. तसेच पहिल्या टप्प्यामध्ये ४,२५,००० घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असल्याची माहिती देखील ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महासंवाद या वेबसाईटवर दिलेली आहे.
सातबऱ्यावर नाव चुकले, जमीन कमी झाली मग असा करा ऑनलाईन अर्ज
बघा कधी चालू होणार महाआवास अभियान ग्रामीण टप्पा २
तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल कि महा आवास अभियान ग्रामीण टप्पा २ कधी पासून चालू होणार आहे तर मित्रांनो हे अभियान अगोदरच चालू झालेले आहे म्हणजेच 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत हे अभियान राबविले जाणार जाणार असल्याची माहिती देखील मंत्री महोदयांनी दिलेली आहे.
घर बांधण्यासाठी जागा नाही मग काय कराल ?
तुम्हाला जर महा आवास अभियान ग्रामीण टप्पा २ अंतर्गत घर मंजूर देखील झाले असेल परंतु घर बांधण्यासाठी जागा, वाळू, रेती आणि इतर साहित्य मिळण्यास अडचण निर्माण होत असेल तर अशा वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, शासकीय जागा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे टच करा.
हि योजना लवकर आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी पुरस्कार.
राज्यातील गोरबरीब जनतेच्या स्वतःच्या पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि महा आवास अभियान ग्रामीण टप्पा २ ला अधिक गती मिळावी यासाठी या योजनेमध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थाना पुरस्कार देखील मिळणार आहे. पुरस्कार मिळणार असल्यामुळे नक्कीच संस्था, व्यक्ती या योजनेमध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न करेल आणि आपसूकच हि योजना यशस्वी होईल.