शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कापसाचे दर वाढण्यास सुरुवात होत आहे. दाक्षिणात्य कापूस लाबीचे कापसाची निर्यात बंदी तसेच कापूस आयात शुल्कात कपात करण्याचेज मनसुबे उधळल्यानंतर कापूस बाजारात तेजीचे वातवरण तयार होण्यास सुरुवात झाली असल्याची बातमी आहे. न्यूयार्क वायदा देखील तेजीने वाढत आहे. ११४ सेंट वरून ११९ सेंटवर हा न्यूयार्क वायदा गेल्यामुळे कापसाचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
या ठिकाणी सोयाबीनला मिळत आहे सर्वात जास्त दर
कापसाचे दर वाढण्यास सुरुवात होत आहे पण का कमी झाले होते कापसाचे दर.
अंतरराष्ट्रीय कापूस बाजारामध्ये भारताची महत्वाची भूमिका आहे कारण भारतात मोठ्या प्रमाणात कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. मागील काही दिवसामध्ये दाक्षिणात्य कापूस लॉबीकडून कापूस बाजार अस्थिर करण्याचे वातावरण तयार करण्यात आले होते. यामध्ये भारतातील कापड लॉबी आणि शेतकरी विरोधी तत्त्वे सक्रीय होते त्यामुळे न्युयॉर्क वायदा बाजार देखील ११४ सेंटच्या खाली आला होता. त्यामुळे कापसाचे दर कमी होण्यास सुरुवात झाली होती.
शेतकरी हित जोपासल्यामुळे कापसाचे दर वाढण्यास सुरुवात
भारतातील कापड लॉबी व शेतकरी विरोधी तत्त्ववाद्यांनी भारताचे पंतप्रधान यांची भेट घेण्याचा प्रयत केला होता परंतु ते काही भेटू शकले नाहीत त्यामुळे कापसाचे दर पाडण्याचे त्यांचे मनसुबे काही कमी आले नाहीत. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे केंद्र शासनाच्या निर्णयाचा शेतकरी वर्गाकडून स्वागतच होत आहेत. शेवटी शेतकरी जगला तरच हा देश जगेल त्यामुळे शेतकरी हित लक्षात घेवूनच शासनाने कोणताही निर्णय घ्यावा. कापसाचे दर वाढण्यास सुरुवात होत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कापसाच्या खंडीचे दर ६३ हजारावरून ६५ हजारांच्या पुढे कापसाचे दर वाढण्यास सुरुवात.
नव्या कापूस हंगामात म्हणजेच ऑक्टोबर २०२१ मध्ये परदेशातील खातेदरांशी १४ लक्ष कापूस गाठींचे सौदे झालेले आहेत. एक कापूस गाठ म्हणजेच १७० किलो कापूस व एक खंडी म्हणजे ३५६ किलो कापूस असे हे परिमाण असते. भारतातून सुमारे ८ लक्ष गाठींची निर्यात बांगलादेश, इंडोनेशिया आणि चीनमध्ये झालेली आहे. सध्या खंडीचे दर ६३ हजारावरून ६५ हजारांच्या पुढे गलेले आहेत शिवाय न्यूयार्क वायदा देखील तेजीने वर सरकत आहे आणि हि शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.
शेतकरी नफ्यात आला तरच भारत खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश ठरेल.
भारताला कृषी प्रधान देश असे म्हटले जाते परंतु नेहमीच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतात. शेती खेत्राचा विकास झाल्याच त्याचा चांगला परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी हित जपणे खूपच महत्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या मुलाला भविष्यात देखील शेतीच करावी असे वाटले पाहिजे आणि त्यासाठी खास धोरण आखले गेले पाहिजे. जर शेती तोट्यात आली तर हळूहळू शेतकरी पुत्रांचा कल शेती सोडून दुसऱ्या क्षेत्राकडे वाढेल आणि त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात त्यामुळे शेतीच्या मालास चांगला भाव उपलब्ध करून देणे खूपच महत्वाचे आहे. ( माहितीचे क्रेडीट – दैनिक ॲग्रोवन )