अतिवृष्टी नुकसान भरपाई list मोबाईलवर कशी बघावी तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई. जुलै ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देखील देण्याचे शासनाने घोषित केले होते. या लेखाच्या सर्वात शेवटी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात व्हिडीओ दिलेला आहे तो देखील पहा.
आता महा डीबीटी पोर्टलवर करा सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज. अधिक माहितीसाठी येथे टच करा.
अतिवृष्टी नुकसान भरपाईची शासनाची मदत काही जिल्ह्यांना यापूर्वीच मिळालेली आहे आणि काही जिल्ह्यांना मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै – ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झाले होते त्या बदल्यात नुकसानभरपाई पोटी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
गोदाम बांधकामासाठी मिळणार साडेबारा लाखांपर्यंत अनुदान
बऱ्याच शेतकऱ्यांना १५ ते १७ हजारापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्ही नंदूरबार जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर बघू शकता. या याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.
आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि मोफत मिळवा सर्व शासकीय योजनांची माहिती
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई मिळालेली आहे त्या संदर्भातील याद्या नंदूरबार जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी असाल तर जाणून घ्या तुमचे नाव या अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीमध्ये आहे किंवा नाही.
आमच्या Whatsapp Group ची लिंक
अतिवृष्टी नुकसान भरपाई list पाहण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सक्रीय असल्याची खात्री करा.
- मोबाईलमधील वेब ब्राउजर ओपन करा.
- ब्राउजरच्या सर्च बारमध्ये nandurbar.gov.in हि वेबसाईट सर्च करा.
- मोबाईलच्या स्क्रीनवर नंदुरबार जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- महिती अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी या वेबसाईटची भाषा बदला.
- भाषा बदलण्यासाठी English या बटनावर टच करताच या ठिकाणी तुम्हाला मराठी हा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
- वेबसाईटची भाषा मराठीमध्ये केल्यानंतर या वेबसाईटवर तीन आडव्या डॅश म्हणजेच रेषा दिसतील त्यावर टच करा. या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील त्यापैकी सूचना या पर्यायासोर दिसत असलेल्या प्लस या आयकॉनवर टच करा.
- त्यानंतर घोषणा या पर्यायावर टच करा.
- जसेही तुम्ही घोषणा या पर्यायावर टच कराल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर २०२१ मध्ये नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांची माहिती असे शीर्षक दिसेल. त्याखाली यादी पाहण्याची लिंक असेल त्यावर टच करा.
अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.
जसे हि तुम्ही यादीच्या लिंकवर टच कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलस्क्रीनवर नंदूरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांची यादी दिसेल सोबतच कोणत्या शेतकऱ्यास किती अनुदान मिळणार आहे हे देखील या ठिकाणी दिसेल. याद्या बघण्यासाठी खालील बटनावर टच करा.
शेतकरी बंधुनो हि तर होती नंदूरबार जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी. तुमच्या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसानभरपाई यादी आली आली आहे किंवा नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असले तर तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला भेट द्या आणि तपासून घ्या.