pradhan mantri awas yojana 2022 अर्थात प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ड यादी संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. या याद्या आता ग्रामपंचायत किंवा गावाच्या दर्शनी भागात लावण्यास सुरवात झाली आहे.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ड यादीमध्ये तुमचे नाव आले म्हणजे तुम्हाला या योजनेचा लगेच लाभ मिळणार आहे असी जर तुमची समजूत असेल तर ती चुकीटची आहे. केवळ ड यादीमध्ये नाव आले म्हणजे झाले असे होत नाही.
ड यादीमध्ये नाव आल्यानंतर परत एकदा स्थळ पाहणी पंचनामा होणार आहे आणि हा स्थळ पाहणी पंचनामा कसा असतो कोणकोणत्या बाबी यामध्ये बघितल्या जातात या संदर्भातच आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.
Pradhan mantri awas yojana 2022 यादी गावातील ग्रामपंचायतीमध्ये लागण्यास सुरुवात.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना pradhan mantri awas yojana 2022 संदर्भात अनेक लाभार्थ्यांच्या याद्या आता प्रकाशित होऊ लागल्या आहेत. प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत ड यादी ग्रामपंचायत दर्शनी भागात किंवा तुमच्या गावातील सार्जनिक ठिकाणी लावली गेली असेल तर हा लेख संपूर्ण समजावून घ्या.
हि योजना अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून या योजनेविषयी अधिक चांगल्या पद्धतीने माहिती समजून घ्या.
pradhan mantri awas yojana 2022 अंतर्गत गरिबांना घर बांधकामासाठी दिले जाते अनुदान.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना योजना अंतर्गत गरीब जनतेला ज्यांना राहायला घर नाही अशा नागरिकांना शासनाच्या वतीने पक्के घर बांधून दिले जाते.
शासकीय वेबसाईट घरकुल यादी लिंक
घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी अगोदर लाभार्थींचा सर्वे केला जातो आणि त्यानुसार मग यादी तयार केली जाते. मित्रांनो अशाच याद्या सध्या गावोगावी प्रकाशित होत आहेत तर याच संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ग्रामीण भागामध्ये बऱ्याच गरीब नागरिकांना पक्क्या घरांची आवश्यकता असते परंतु आर्थिक अडचणीमुळे असे नागरिक घरे बंधू शकत नाहीत.
ह्याच बाबीचे महत्व लक्षात घेवून शासनाच्या वतीने गरीब जनतेला पक्के घर बांधकाम अनुदानासाठी पात्र लाभार्थी यादी आता गावोगावी प्रकाशित होत आहेत.
हा लेख पण वाचा असा करा संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ घ्या.
प्रत्येकालाच वाटते कि आपल्याला देखील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ मिळायला हवा त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागामध्ये खूप स्पर्धा बघावयास मिळते.
यामुळे ज्या लोकांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ मिळायला हवा त्यांच्याऐवजी गावातील साधन व्यक्तींनाच लाभ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही गावांमध्ये घरकुल सर्वेक्षणाची ड यादी लावण्यात आलेली आहे. काही ठिकाणी गट विकास अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा सुरु करण्यात आलेला आहे.
या स्थळ पाहणी पंचनाम्याम्ध्ये कोणकोणती माहिती विचारलेली आहे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकला टच करा आणि हा स्थळ पाहणी पंचनामा तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्या.
पुढील लेख पण वाचा बांधकाम कामगारांना मिळणार ५१ हजार रुपयांचे अनुदान
स्थळ पाहणी पंचनामामध्ये विचारली जाणारी सर्वसाधारण माहिती खालील प्रमाणे.
- ज्याला मोटर लावलेली आहे असे मोटारयुक्त दोन तीन चारचाकी मासेमारी बोट आहे का
- यांत्रिक तीन किंवा चारचाकी उपकरणे आहेत का.
- किसान क्रेडीट कार्डसोबतच ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त मर्यादा आहे का.
- ज्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्या लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्तीची नोंदणी शासकीय उपक्रमात आहे का.
- अकृषिक कुटुंबे ज्यांची नोंदणी शासकीय उपक्रमात आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती दरमहा १०००० रुपयांपेक्षा जास्त कमवितो का.
- आयकर किंवा व्यावसायिक कर भरला आहे का.
- लाभार्थ्यांच्या घरी त्यांचा स्वतःचा रेफ्रिजरेटर आहे का
- लाभार्थ्याकडे स्वतःचा landline फोन आहे का.
- २.५ एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन आहे का.
घरकुल स्थळ पाहणी पंचनामा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
Pradhan mantri awas yojana 2022 संदर्भातील व्हिडीओ पहा.
वरील प्रमाणे माहिती या स्थळ पाहणी पंचनामामध्ये विचारली जाते. वर दिलेले मुद्दे या पंचनाम्यातील ठराविक मुद्दे होते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा पंचनामा वाचून घ्या किंवा या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी खालील बटनावर टच करा किंवा क्लिक करा.
मित्रांनो योजनेची तर माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु तुम्हाला कदाचित असाही प्रश्न पडू शकतो कि या योजना येतात आणि जातात याचा गरिबाला कोणताही फायदा होत नाही.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात परंतु त्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे देखील एक महत्वाचे कारण योजनेचा लाभ न मिळण्याचे ठरू शकते.
योजनेची माहिती घेत चला
इंटरनेटमुळे माहितीची देवाण घेवाण घेणे अगदी सोपे होऊन बसलेले आहे. त्यामुळे शासकीय योजनांची माहिती देखील तुम्ही अगदी चुटकी सरशी काढू शकता.
पूर्वी ग्रामीण भागामध्ये काही ठराविक लोकांनाच शासकीय योजनांची माहिती असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना याविषयी जास्त माहिती नसण्याची शक्यता होती. त्यामुळे ठराविक लोकांचा लोकांनाच या योजनांचा लाभ मिळत असे.
कारण जो पर्यंत तुम्ही एखाद्या योजनेसाठी अर्ज करत नाही तोपर्यंत तुम्हाला योजनेचा लाभ मिळणारच नाही. कोणत्याही योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अगोदर अर्जदारास अर्ज करणे गरजेचे असते. अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पोच पावती घ्यावी.
हा लेख पण वाचा या शेत रस्ता मंजूर यादी आली.
कोणत्याही योजनेचा अर्ज दाखल केल्यानंतर त्याची पोच घ्या.
अर्जाची पोच पावती तुमच्याकडे असली तर त्या आधारे तुम्ही त्या योजनेविषयी माहिती घेऊ शकता. जसे कि एकाच योजनेसाठी अनेकांनी अर्ज केला असेल आणि त्या योजनेचा लाभ तुमच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या लाभार्थ्यास दिला गेला असेल तर अशा वेळी त्या लाभार्थ्यास नेमका कोणत्या निकषावर लाभ दिला गेला याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता.
घरकुल योजना असो कि शेती संबधित अनुदान योजना असो कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला त्या योजनेची सर्व माहिती असणे गरजेचे आहे.
विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी खालील लिंकला टच करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.