कडबा कुट्टी मशीन योजना २०२२ chaff cutter machine संदर्भात माहित जाणून घेवूयात. ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाई, म्हशी, शेळ्या किंवा शेतीसाठी जनावरे शेतकऱ्यांना पाळावी लागतात.
विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर हवी आहे काय मग आमचा Whatsapp Group मध्ये सामील व्हा.
शेतीतील बरेच कामे बैलांच्या सहाय्याने केली जातात. त्याचप्रमाणे शेतीला जोड धंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय व दुग्धपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केले जाते.
ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत त्यांना चारा पाणी व्यवस्थित करावे लागते. यामध्ये प्रामुख्याने गुरांना लागणारा चारा कापण्यासाठी शेतकरी बांधवाना खूप कष्ट करावे लागते. त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे गुरे असतील तर त्यांचा चारा पाणी करण्यासाठी कडबा कुट्टी मशीन म्हणजेच chaff cutter machine खूप मदतीचे ठरेल.
हा पण लेख वाचा नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार अनुदान
कडबा कुट्टी मशीन फायदे
- कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
- खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.
- चारा बारीक केल्याने जनावरांना खाण्यास सोपा जातो.
- चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.
- नासाडी कमी होते.
वरीलप्रमाणे कडबा कुट्टी मशीनचे शेतकऱ्यांना फायदे होत असतात. हे कडबा कुट्टी मशीन तुम्ही शासकीय अनुदानावर देखील खरेदी करू शकतात. याच संदर्भात आपण या ठिकाणी अगदी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
असा करा ऑनलाईन अर्ज.
शासकीय अनुदानावर जर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज सादर करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
या लेखाच्या सर्वात खाली कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात व्हिडीओ दिलेला आहे. तो व्हिडीओ बघा आणि त्यानुसार तुमचा अर्ज सादर करा.
- mahadbt वेब पोर्टलवर जा.
- युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- तुमची नोंदणी झाली नसेल तर नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.
- लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये खालीलप्रमाणे माहिती निवडायची आहे.
- मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
- तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
- व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नाही.
- यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा.
- प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.
- सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व upto 3 असे पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. वरील माहिती तुम्हाला समजली नसेल तर खालील व्हिडीओ बघून देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
महाडीबीटी वेब पोर्टलवर कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
लॉटरी पद्धतीने अर्जदारांची योजनेसाठी निवड केली जाते. एकदा का निवड झाली कि अर्जदारास संदेशाने कळविले जाते.
Kadaba kuti