जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सुरु.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सुरु.

आजच्या लेखामध्ये आपण जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सुरु झालेले आहेत त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

समाजामध्ये काही तरुण असेही असतात ज्यांना समाजकार्यही आवड असते. समाजाची सेवा करण्यात त्यांना आनंद वाटतो. तर अशा तरुणानाचा किंवा तरुणींचा या समाज कार्यासाठी गौरव व्हावा त्याचपरमेण यापुढे देखील त्यांना वकास कार्य करण्याची प्रेरणा मिळावी किंबहुना इतरांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा यासाठी शासनाच्या वतीने तरुण तरुणींना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा कोणत्या वेबसाईटवर करावा या संदर्भात आपण या ठीकानी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

युवकांना जिल्हा युवा पुरस्कार जिंकण्याची संधी.

एक संस्था, एक तरूण व एक तरुणी यांना हा जिल्हा युवा पुरस्कार दिले जाणार आहेत.

विकास कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे तसेच जिल्ह्यातील तरुण  व तरुणी आणि समाजहिताचे कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था यांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे. यासाठी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

हा लेख पण वाचा कडबा कुट्टी मशीनसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

जिल्हा युवा पुरस्कार ठळक बाबी

योजनेचे नावजिल्हा युवा पुरस्कार
अर्जऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाणजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर संभाजीनगर समोर, आकोर्ली रोड कांदिवली पूर्व मुंबई ४००१०१ ( अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
वयोमर्यादाएप्रिल २०२२ रोजी कमीत कमी १३ जास्तीत जास्त ३१ वर्षे
कोण करू शकतो अर्ज – युवक, यवती व संस्था
माहितीचा स्त्रोत महासंवाद वेबसाईट
माहितीचा स्त्रोतमहासंवाद वेबसाईट
जिल्हा युवा पुरस्कारासाठी

पुरस्कारासाठी पात्रता

१. सध्या सुरु असलेल्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी युवक किंवा युवतीचे  पुरस्कारासाठी वय १३ वर्षे पूर्ण असावेत.

२. जास्तीत जास्त वयोमर्यादा म्हणजे ३१ मार्च रोजी ३५ वर्षाच्या आत असला पाहिजे.

३. सलग पाच वर्ष अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्हात वास्तव्यास असायला हवा..

४. अर्जदाराने अर्जासोबत त्यांच्या कार्यासंबाधित वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेय बातम्यांची कात्रणे, फोटो, चित्रफिती, प्रशस्तीपत्रे इत्यादी अर्जासोबत सादर करावीत.

५. केंद्र किंवा राज्य शासनाच्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी या पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार नाहीत.

६.कर्मचारी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी सुद्धा जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार नाहीत.

७. संस्थेसाठी असलेल्या युवा पुरस्कारासाठी संस्थेची नोंदणी झाल्यानतर पाच वर्षे संस्था कार्यरत असली पाहिजे.

८.गुणांकनाकरिता संस्थेने केलेले कार्याचे वृत्त पत्रातील बातम्यांचे कात्रणे, चित्रफिती, फोटो, प्रशस्तीपत्रे अर्जासोबत जोडावीत.

९. संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियमानुसार नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.

अर्जदाराने पुरस्कारासाठीचा अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर संभाजीनगर समोर, आकोर्ली रोड कांदिवली पूर्व मुंबई ४००१०१ येथे सादर करायचे आहेत.

जिल्हा युवा पुरस्कार संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर ०२२ २८८७११०५ या नंबरवर कॉल करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *