शबरी घरकुल योजना निधी आला pdf मध्ये अर्ज डाउनलोड करा.

शबरी घरकुल योजना निधी आला pdf मध्ये अर्ज डाउनलोड करा.

शबरी घरकुल योजना shabari gharkul yojana संदर्भात माहिती जाणून घेवूयात या लेखामध्ये जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. शबरी घरकुल योजनेसाठी नुकताच निधी वितरीत करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

आदिवासी घटक योजना अंतर्गत सन २०२२-२३ साठी शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.

शबरी घरकुल योजना निधी आला

आदिवासी घटक कार्यक्रमाद्वारे शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत प्रत्येक वर्षी पक्के घर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. शबरी घरकुल योजना लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट निश्चित केले जाते आणि त्यानुसार हे अनुदान दिले जाते.

५९२५.५१ एवढा निधी शबरी घरकुल योजनेसाठी देण्यात येत आहे त्यामुळे हि योजना आहे तरी कशी, अर्ज कसा आणि कोठे करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

पुढील लेख पण वाचा घरकुल योजनेचा असा घ्या लाभ

शबरी घरकुल योजनेसाठी नियम व अटी.

  • शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्रील रहिवासी असावा.
  • कमीत कमी १५ वर्षे एवढा कालावधीसाठी लाभार्थी हा महाराष्ट्रात रहिवास करणे गरजेचे आहे.
  • लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वत:चे किंवा लाभार्थ्यांच्या कुटुंबियांकडे पक्के घर नसावे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.
  • लाभार्थी किंवा अर्जदार यांच्या एकूण कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे  पुढीलप्रमाणे असावी. १) ग्रामीण क्षेत्रासाठी १ लक्ष रुपये. २) नगरपरिषद क्षेत्रासाठी १.५० लक्ष रुपये. ३) महानगर पालिकेसाठी २ लक्ष रुपये.
  • घरकाम बांधकाम करण्यासाठी खर्च मर्यादा पुढीलप्रमाणे आहे. १) ग्रामीण सर्वसाधारण क्षेत्र १.३२ लक्ष रुपये. नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्र असेल तर अशावेळी हि खर्च मर्यादा १.४२ लक्ष एवढी आहे २) नगर परिषदेसाठी १.५० लक्ष ३) महा नगर पालिकेसाठी २ लक्ष रुपये.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • २ पासपोर्ट साईज फोटो.
  • जातीचे प्रमाणपत्र caste certificate.
  • रहिवासी प्रमाणपत्र domicile Certificate.
  •  शेतीचा 7/12 उतारा व नमुना 8-अ.
  • शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला Leaving certificate.
  • घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र.
  • तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र.
  • ग्रामसभेचा ठराव.

हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.

शासन निर्णय पहा.

घरकुल योजना लाभाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे..

  • १०० टक्के अनुदान ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिले जाते.
  • नगर परिषद भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ७.५० टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
  • महानगर पालिका येथील रहिवाशांसाठी १० टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.

लाभार्थीचे घरकुल बांधकाम सुरु असतांना संबधित जिल्हा व तालुका स्तरावर घरकाम बांधकामाचा आढावा घेतला जातो आणि त्यानुसार लाभार्थीस अनुदान वितरीत केले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील ग्राम पंचायत, पंचायत समिती तसेच गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता. इतर आदिवासी योजनांच्या अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, त्यासाठी येथे क्लिक करा.

शबरी घरकुल आवास योजनेचा PDF अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *