उद्योग व्यवसाय सुरु करण्यासास्ठी इच्छुक अर्जदारांकडून अण्णाभाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज दिनांक १४ जुलै २०२२ पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा अंतर्गत बेरोजगार तरुणांना त्यांचं उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज मिळणार आहे.
अण्णाभाऊ साठे कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेल्या मातंग समाजातील वैयक्तिक लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी कर्ज मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी त्यांचे अर्ज दिनांक १४ जुलै २०२२ पर्यंत सादर करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहेत.
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना 2022
सदरील अर्ज सादर संबधित महामंडळाच्या सामाजिक न्याय भवनातील जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
पुढील लेख पण वाचा शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार अनुदान नवीन सरकारची घोषणा
अण्णाभाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत उद्योग व्यवसाय सुरु करता येणार.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास अर्ज करण्यासाठी स्वतः हजर राहावे लागणार आहे. त्रयस्थ व्यक्तीद्वारा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
तुम्ही ज्या जिल्ह्यातील रहिवासी असाल त्या जिल्ह्याच्या संबधित कार्यालयाशी या योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
जालना जिल्ह्यासाठी अनुदान योजनेसाठी १५० तर भांडवल योजनेसाठी १०० असे उद्दिष्ट तयार करण्यात आलेले आहे.
अर्ज स्वीकृतीच्या वेळेस अर्जासोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर कर्ज योजनेचा अर्जदारांनी अवश्य लाभ घ्यावा. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालेली आहे.
अशा वेळी या योजनेचा लाभ घेवून उद्योग व्यवसाय सुरु केल्यास नक्कीच अर्जदारास रोजगार मिळेल. या योजने अंतर्गत उभारलेल्या उद्योगातून रोजगारनिर्मिती होईल त्यामुळे आपसूकच इतरांना देखील काम मिळेल.
बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वेबसाईटला भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला विविध योजनांची माहिती मिळेल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
तर ज्या अर्जदारांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची आवश्यकता आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेवून आपला उद्योग व्यवसाय सुरु करावा.