बियाणे प्रक्रिया व साठवणूक केंद्र उभारणीसाठी म्हणजेच गोदाम उभारणीसाठी ६० लक्ष एवढा निधी मिळणार असल्याचा जी आर नुकताच आलेला आहे. या योजनेचा नेमका कोणत्या घटकांना लाभ मिळणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेवूयात.
बियाणे व लागवड साहित्य उप अभियानांतर्गत खालील घटकांसाठी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- ग्रामपंचायत पातळीवर शेतकरी उत्पादक कंपनी. ( तुम्हाला जर माहित नसेल कि शेतकरी उत्पादक कंपनी कशी निर्माण करावी त्यासाठी लागणारा प्रस्ताव अगदी मोफत pdf मध्ये डाउनलोड करून घ्या. त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. )
- स्वयंसहाय्यता बचत गट म्हणजेच सेल्फ हेल्प ग्रुप ( SHG )
- अन्नधान्य उत्पादक संघ.
- सहकारी संस्था.
वरील बाबींसाठी बीज प्रक्रिया केंद्र ज्याची क्षमता ५०० मेट्रिक टन इतकी असेल. तसेच बियाणे साठवणुकीसाठी गोदामाची उभारणी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे.
शेतकरी योजना व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक
बियाणे प्रक्रिया व गोदाम उभारणीसाठी ६० लक्ष निधी मिळणार
सदरील योजना पूर्णपणे केंद्रपुरस्कृत असल्याचे देखील शासन जी आर मध्ये कळविण्यात आलेले आहे. बीज प्रक्रिया केंद्र व गोदाम उभारणीसाठी महाराष्ट्रामध्ये ५० युनिट उभारणीसि लक्ष्य दिलेले आहे.
केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उपभियान (SMSP) अभियानांतर्गत बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामांची उभारणी करण्याच्या कामासाठी ग्रामपंचायत स्तरावर ६० लाख एवढा निधी दिला जाणार आहे. तुम्हाला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अधिक माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.
या संदर्भातील जी आर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शेतकरी उत्पादक कंपनीला होणार फायदा.
कोणतीही बाब असो संघटन असेल तर जास्त लाभ किंवा फायदा मिळतो. शेतकरी असोत कि मग बचत गट जेंव्हा एकत्रित येतात तेंव्हा अशा संघटनांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असतो.
या योजनेसाठी स्वयंसहाय्यता बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनी अर्ज करू शकतात. स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन कसा करावा हे तर जवळपास सर्वांनाच माहित आहे परंतु शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट कसा स्थापन करावा हे बहुधा काहीना माहित नसण्याची शक्यता आहे.
अनेक शेतकरी गट मिळून एक शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण केली जाते. बऱ्याच शेतकरी बांधवाना शेतकरी गट स्थापन कसा करायचा असतो. त्यासाठी लागणारा प्रस्ताव कोठे मिळेल अशा बऱ्याच शंका येत असतात.
शेतकरी गट स्थापनेचा प्रस्ताव pdf मध्ये उपलब्ध.
याच बाबीचे महत्व लक्षात घेवून आम्ही तुमच्यासाठी शेतकरी गट स्थापन करण्याच्या संपूर्ण प्रस्ताव अगदी pdf मध्ये ओरिजिनल स्वरुपात उपलब्ध करून दिलेला आहे.
हा प्रस्ताव तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून प्रिंट काढू शकता आणि सादर करू शकता. शेतकरी गट स्थापन करण्यासठी प्रस्ताव pdf मध्ये सादर कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
केवळ हीच योजना नव्हे तर शास्नाह्य अनेक योजना शेतकरी उत्पादक कंपनीला मिळत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवानी त्यांचा समूह तयार करून शेतकरी गट निर्माण केल्यास त्यांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो.