रोजगार हमी योजना 2022 मध्ये बदल करण्यात आला असून आता कामावरील मजुरांचे फोटोसहित ऑनलाईन हजेरी घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगार हमी योजना अंतर्गत काम करत असतात. बेरोजगारी वाढल्यामुळे नारीकाना कामाची आवश्यकता असते. अशावेळी केंद्र शासनाच्या रोजगार हमी योजनेतून ज्यां व्यक्तींना काम हवे असेल त्यांना काम दिले जाते.
रोजगार हमी योजनेतून जर तुम्ही कामाची मागणी केली आणि तुम्हाला काम उपलब्ध झाले नाही तर अशावेळी शासनाच्या नियमानुसार भत्ता मिळतो.
जाणून घ्या रोजगार हमी योजना 2022 संदर्भातील माहिती.
१०० दिवसाचे काम या योजनेतून कामगारास उपलब्ध करून दिले जाते. गावपातळीवर हि योजना मोठ्या प्रमाणत राबविली जाते. या योजनेतून ग्रामीण भागातील अनेक तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले जाते.
रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यासठी आगोदर रोजगार सेवक किंवा ग्राम सेवक यांच्याकडे अर्ज करावा लागतो. तुमच्या नावाची नोंद रोजगार सेवक करून घेतात आणि तुम्हाला जॉब कार्ड दिले जाते.
जस जसे तुम्ही रोजगार हमी योजनेत काम कराल त्या कामाचा सर्व तपशील तुम्हाल तुमच्या जॉब कार्डवर पहावयास मिळतो.
तुमचे जॉब कार्ड हरविले तर हे जॉब कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकता.. तुम्हाला जर माहित नसेल कि जॉब कार्डसाठी ऑनलाईन आज कसा करावा तर खालील लिंकवर क्लिक करा.
असा करा जॉब कार्डसाठी ऑनलाईन अर्ज
अधिक पारदर्शक होणार रोजगार हमी योजना
रोजगार हमी योजनेच्या कामावर शक्यतो गावातील गरीब नागरीकच जात असतात. बऱ्याच वेळेला अशा नागरिकांची फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या यापूर्वी वाचण्यात आल्या.
रोजगार हमी योजनेमध्ये पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जातो परंतु तरी देखील कधी कधी सामान्य नागरिकांवर या योजनेतून अन्याय झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गावाचा कारभार मुख्यत: सरपंच व ग्रामसेवक बघत असतात. रोजगार हमी योजनेमध्ये काही गैरप्रकार होत आहे असा संशय जरी आला तरी ग्रामसेवक किंवा सरपंच एकूण घेतील का किंवा आपल्या शंकेचे निरसन करतील का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होऊ शकतो.
नॅशनल मॉनिटरिंग सिस्टीम मोबाईल ॲप्लिकेशन.
याच बाबीचे महत्व लक्षात घेवून शासनाने रोजगार हमी योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आणले आहे ज्याचे नाव नॅशनल मॉनिटरिंग सिस्टीम असे आहे.
नॅशनल मॉनिटरिंग सिस्टीम मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून आता रोजगार हमी योजनेवर काम करत असलेल्या मजुरांची दिवसातून दोन वेळा हजेरी घेतली जाते.
जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी २० किंवा त्यापेक्षा जास्त मजूर काम करतात त्या मंजुरांची उपस्थिती या ॲप्लिकेशनमध्ये दर्शवली जाते.केवळ ऑनलाईन हजेरीच नव्हे तर त्यासोबत दिवसातून दोन वेळा नोंदणीसह फोटो देखील अपलोड करावे लागतात.
रोजगार हमी योजनेच्या कामावर प्रत्यक्ष किती मजूर हजर आहेत हे या नॅशनल मॉनिटरिंग सिस्टीम मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे समजण्यास सोपे होणार आहे. त्यामुळे यापुढे रोजगार हमी योजनेमध्ये नक्कीच पारदर्शकता येवू शकते.