सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने गटई कामगार योजना अंतर्गत लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना त्यांच्या उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी या लोखंडी पत्र्याचे स्टॉलचा उपयोग होऊ शकतो.
लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दिनांक २९ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
गटई कामगार योजना पात्रता
योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत. अर्ज कोठे करावा. कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत या संबधी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप हि योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येते. या व्यतिरिक्त देखील विविध कल्याणकारी योजना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येतात.
अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतील. तुम्ही जर या प्रवर्गातील असाल तर लगेच अर्ज करण्याच्या शेवट दिनांकाच्या आत तुमचा अर्ज करून द्या.
पुढील योजना पण पहा. वैयक्तिक शेततळे योजना
गटई कामगार योजना कागदपत्रे
लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.
- अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला दाखला.
- चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला.
- अर्जदाराचे किंवा कुटुंबाचे रेशन कार्ड.
- गटई कामाचे प्रमाणपत्र किंवा अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र.
- ज्या ठिकाणी व्यवसाय कराल त्या संबधित जागेचे ना हरकत प्रमाणपत्र.
- आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.
वरील प्रमाणे कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
तुम्ही जर जालना जिल्हा व्यतिरिक्त जिल्ह्यातील असाल तर संबधित कार्यालयाशी संपर्क साधा.
२९ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अर्ज करण्याच्या शेवट दिनांकाच्या आत म्हणजेच २९ जुलै २०२२ पर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करून द्यावेत त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांच्या अधिक माहितीसाठी सामाजिक विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला तुम्ही भेट देवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा.
गटई कामगार योजना अंतर्गत लोखंडी पत्र्याचे स्टॉलसाठी अर्ज करून लाभार्थी त्यांच्या व्यवसाय सुरु करू शकतात. या योजनेमुळे गटई कामगार त्यांचा व्यवसाय उद्योग उभारता यावा हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींनी वरती दिलेले कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज सादर करून द्यावेत.