मोफत निर्धूर चूल योजना अर्ज सुरु झाले असून अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा कसा करावा आणि यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
ग्रामीण भागातील बऱ्याच महिला स्वयंपाक करण्यासाठी अजूनही सरपण वापरतात. काही कुटुंबाकडे गॅस जरी मिळत असला तरी त्यासाठी खर्च येतो म्हणून ग्रामीण भागातील महिला पुन्हा एकदा चुलीकडे वळलेल्या आहेत.
चुलीवर स्वयंपाक करतांना चुलीतील निर्माण झालेला धूर महिलांच्या श्वसन नलिकाद्वारे त्यांच्या शरीरात जातो. यामुळे श्वसनाच्या विविध समस्या उद्भवतात.
पुढील योजना पण पहा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार
मोफत निर्धूर चूल योजना अर्ज सुरु झाले.
गॅसची वाढलेली किंमत लक्षात घेता निर्धूर चूल योजनेचा लाभ घेवू शकतात. ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जातात. यापैकीच एक म्हणजे मोफत निर्धूर चूल योजना होय.
ग्रामीण भागातील कुटुंबाना उज्जवला योजनेतून गॅस दिल्यानंतर आता शासनाच्या वतीने निर्धूर चूल योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचे अर्ज सुरु झालेले आहेत.
समाज कल्याण विभागाच्या वतीने हि निर्धूर चूल वाटप करण्यात येणार आहे. निर्धूर चूल योजना अर्ज कसा कारवा लागतो या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेवूयात आहोत.
मोफत निर्धूर चूल योजना माहिती.
ऑनलाईन अर्ज सुरु करण्यापूर्वी हि मोफत निर्धूर चूल योजनेसाठी पात्रता कोणती आहे ते जाऊन घेवूयात जेणे करून अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला व्यवस्थित कल्पना येवू शकेल.
- अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे किंबहुना अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे गॅस कनेक्शन नसावे.
खालील कागदपत्रे आवश्यक.
- आधार कार्ड.
- राशन कार्ड.
- रहिवासी पुरावा.
- मोबाईल नंबर.
- इमेल आयडी.
- जातीचे प्रमाणपत्र
- योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपतपत्र.
असा करा ऑनलाईन अर्ज.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी असून अर्जदार त्यांच्या स्मार्ट फोनवरून देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा.
- https://maha-diwa.vercel.app/ या वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईट ओपन झाल्यावर अर्जामध्ये दिलेली माहिती व्यवस्थित भरा.
- आधार कार्डवर ज्या पद्धतीने नाव दिलेले आहे त्या पद्धतीने नाव टाईप करा.
- मोबाईल नंबर टाका.
- आधार क्रमांक टाका.
- संपूर्ण पत्ता टाका.
- जिल्हा आणि तालुका निवडा.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून मोफत निर्धूर चूल योजनासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.