ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी आता पहिल्यापेक्षा अधिक सोपी झालेली आहे. हि ऑनलाईन नोंदणी कशी करावी या संदर्भात अगदी सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत माहिती वाचा.
आजही मोठ्या प्रमाणत ग्रामीण भागामध्ये नागरिक बांधकाम कामगार म्हणून काम करत असतात. अशा कामगारांसाठी शासन विविध योजना राबवीत असते.
एखादा मजूर बांधकाम कामगार म्हणून काम करत असेल तर त्या व्यक्तीस तेंव्हाच लाभ मिळतो जेंव्हा तो बांधकाम कामगार म्हणून त्याची नोंदणी करतो. त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी करणे खूप गरजेचे आहे.
थोडक्यात काय तर बांधकाम कामगार नोंदणी केली तरच तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. खालील माहिती तुम्हाला मिळणार आहे.
पुढील माहिती पण कामाची आहे. घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणार शिंदे सरकारचा निर्णय
ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी संदर्भातील महत्वाची माहिती.
- बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करावी.
- ऑनलाईन नोंदणी करण्याची वेबसाईटवर वेबसाईट कोणती आहे.
- कोणकोणत्या योजनांचा लाभ नोंदणी केल्यावर कामगारांना मिळतो.
- कागदपत्रे कोणती अपलोड करावी लागतात.
या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या, जेणे करून बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.
असंघटीत कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे Maharashtra imarat v itr bandhkam kamgar kalyankari mandal विविध योजना राबविल्या जातात आणि याच वेबसाईटवर बांधकाम त्यांची कामगार म्हणून नोंदणी करू शकतात.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे एकूण ३२ योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी असंघटीत बांधकाम कामगार यांना मंडळाच्या वेबसाईटवर जावून नोंदणी करावी लागते.
ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया.
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटला भेट द्या किंवा डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
- अर्जदाराने त्यांचा जिल्हा, आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून proceed to farm या बटनावर क्लिक करावे.
- वरील माहिती भरून झाली एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये वैयक्तिक माहिती भरा.
वैयक्तिक माहिती माहितीमध्ये खालील माहिती भरा.
- अर्जदाराचे नाव.
- अर्जदाराच्या वडिलाचे नाव.
- आडनाव.
- दिलेल्या यादीमधून लिंग निवडा.
- आधार नंबर आपोआप आलेला असेल.
- अर्जदाराची वैयक्तिक स्थिती निवडावी. अर्जदार विवाहित किंवा अविवाहित असे तर त्या संदर्भातील पर्याय निवडावेत.
- अर्जदाराने आपली जन्म तारीख अचूक टाकावी.
- जन्मतारीख टाकताच तुम्हे वय पुढील चौकटीमध्ये दिसेल.
- अर्जदार कोणत्या वर्गवारीमधील आहे हे दिलेल्या पर्यायामधून निवडावे.
- मोबाईल नंबर देखील आपोआप आलेला असेल.
- पीएफ किंवा युएन नंबर उपलब्ध असेल तर तो टाकावा नसल्यास हा रकाना अर्जदार मोकळा सोडू शकतात.
- ईएसआयसी क्रमांक टाकावा नसेल तर हा पर्याय देखील तुम्ही मोकळा सोडू शकता.
- इमेल आयडी असेल तो तो देखील टाकावा.
वरील संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर अर्जदाराने त्यांचा पत्ता व्यवस्थित टाकावा. कायमचा पत्ता आणि निवासी पत्ता एकच असेल तर फक्त दिलेल्या चौकटीमध्ये टिक करावे.
कौटुंबिक तपशील खालीलप्रमाणे.
अर्जदारास त्यांचे कौटुंबिक तपशील खालीलप्रमाणे टाकावे लागणार आहे.
- घरातील व्यक्तींचे नाव.
- त्या व्यक्तीच्या वडिलाचे नाव.
- आडनाव.
- जन्मतारीख.
- वय.
- संबध.
- त्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक.
- व्यवसाय.
बांधकाम कामगार नोंदणी करतांना बँकेचे तपशील खालीलप्रमाणे टाका.
- अर्जदाराच्या बँकेचा आयएफएससी कोड.
- बँक शाखेचे नाव.
- बँकेचा पत्ता.
- एमआयसीआर कोड.
- बँक खाते क्रमांक.
नियोक्ता तपशील, सध्याच्या नियोक्त्याचा तपशील, ९० दिवसांच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील इतर संपूर्ण माहिती टाकावी.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
- फोटो आयडी पुरावा.
- रहिवासी पुरावा.
- वयाचा पुरावा.
- बँक पासबुक झेरॉक्स.
- ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
- स्वयंघोषणापत्र.
- आधार संमतीपत्र.
वरील सर्व कागदपत्रे JPEJ, JPG, PNG किंवा pdf format मध्ये असावीत. सदरील कागदपत्रांची साईज २ एमबी पेक्षा जास्त नसावीत.
अशा प्रकारे वरील कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सर्वात शेवटी सेव्ह या बटनावर अर्जदारास क्लिक करावे लागणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
ज्या महिला किंवा पुरुष इमारत बांधकामकामगार आहेत किंवा इतर कामगार आहेत अशा व्यक्ती त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात.
बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येते?
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्यावी. ऑफलाईन नोंदणी करायची असेल तर संबधित जिल्ह्याच्या बांधकाम कामगार कार्यालयास भेट द्यावी.
ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे अशा बांधकाम कामगारांना एकूण ३२ योजनांचा लाभ मिळतो. ह्या योजना कोणकोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी बांधकाम कामगार वेबसाईटला भेट द्या.