कापसाला न भूतो असा बाजार भाव सध्या मिळत आहे त्यामुळे कापूस उत्पादन वाढवायचे असेल काही उपाय करणे गरजेचे आहे जे कि या लेखामध्ये सांगितलेले आहे.
तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही देखील कापूस हे पिक तुमच्या शेतामध्ये लावलेले असेल तर तुमच्या शेतातील कपाशी किड मुक्त असली पाहिजे तरच तुम्हाला कापसाचे दर्जेदार उत्पादन मिळू शकते.
तुमच्या शेतामध्ये तुम्ही किती जास्त कपाशी लावलेली आहे यापेक्षा ती कपाशी कीडमुक्त आहे का याला ज जास्त महत्व आहे. कीड मुक्त कपाशी असेल तर जास्त उत्पादन मिळेल आणि जास्त उत्पादनामुळे अर्थातच शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसा येईल.
चांगले पिक येण्यासाठी ते निरोगी असणे आवश्यक आहे जेणे करून कापूस उत्पादन वाढवायचे काही पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत कपाशीवरील गुलाबी बोंड अळी आणि रसशोषक कीड नियंत्रण संदर्भातील माहिती.
हा लेख पण वाचा कापसाला प्रचंड भाव मिळण्याची शक्यता यामुळे वाढत आहे भाव.
कापसाला मिळतोय प्रचंड भाव पण कापूस उत्पादन वाढवायचे कसे
कपाशी पिकांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन, न केल्यास उत्पादनात 40 ते 90% पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे पिकांचे नियमित सर्वेक्षण करण हे आवश्यक आहे. किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास नियंत्रणासाठी योग्य उपाय योजनांचा अवलंब केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते.
गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापना करता आठवड्यातून एक वेळ कपाशीच्या शेतातील 12 ते 14 झाडांचे निरीक्षण करावे. निरीक्षण करताना ते झाड संपूर्ण शेताचे प्रतिनिधित्व करेल अशी झाडे निवडावीत.
या झाडावरील एकंदरपात्या, कळ्या, फुले आणि हिरवी बोंडे मोजावीत. त्यापैकी गुलाबी बोंड अळी प्रादुर्भावग्रस्त किती झाडे आहेत ती काळजीपूर्वक मोजावीत.
नुकसानीचे प्रमाण पाच टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी योग्य ती उपाययोजना करावी. पिक 40 ते 45 दिवसाचे झाल्यावर शेतामध्ये बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी दोन कामगंध सापळे उभारावेत. नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत.
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहा
कापूस उत्पादन वाढवायचे मग कीड नियंत्रण करणे गरजेचे
बोंड आळींच्या प्रकारानुसार विविध लिवरचा वापर करावा. प्रत्येक महिन्यात या सापळ्यामधील लिव्हर बदलावेत. सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच फेरोमोन सापळे पिकांपेक्षा एक ते दीड फूट उंचीवर लावून त्यात गुलाबी बोंड अळीचे लिंग प्रलोभने गॉसिप्लोर बसवावे.
या फोरेमन ल्युअर ट्रॅप सापळ्यामध्ये दोन ते तीन दिवस सतत आठ ते दहा पतंग आढळून आल्यास त्वरित उपाययोजना कराव्यात.
बीटी कपाशीच्या शेतातील हिरवी बोंडे फोडून नियमित सर्वेक्षण करावे. गुलाबी बोंड अळ्यांनी प्रादुर्भावग्रस्त दहा टक्के बोंडे आढळल्यास व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात.
हंगामामध्ये बीटी कपाशीच्या शेतात कामगंध सापळे लावावेत. आर्थिक नुकसान पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नुकसाटी ट्रायकोडर्मा स्प्रे या मित्र कीटकांची अंडी ट्रायको कार्ड शेतात लावावीत. १.५ लक्ष अंडी प्रती हेक्टर असा वापर करावा.
शेतीमध्ये मित्र कीटकांचा उपयोग होणारी फायद्याचा
पिकावर मित्र कीटक म्हणजेच लेडी बर्ड बीटल, क्रायसोपा यांचा वापर करावा. कपाशी पिकांवर किडी, मावा, तुडतुडे फुलकिडे, अळ्या याचे प्रमाण १ : ५ आढळल्यास रासायनिक कीटकनाशकाऐवजी निंबोळी अर्क ५ टक्के प्रमाणे फवारणी करावी.
हिरव्या बोंड अळीचे नुकसान 5% पेक्षा जास्त असल्यास HANPV 500 LE प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी करावी मान्सूनपूर्व कपाशीची अर्धवट उमलेली म्हणजेच गुलाबी डोमअळीच्या डोमकाळ्या तोडून टाकाव्यात.
किडींनी आर्थिक नुकसानपातळी ओलांडल्यानंतर निंबोळी अर्क किंवा कडूनिंबयुक्त कीटक नाशक azadirachtin 300 PPM 50 मिली किंवा spinosad 45 SP, 2.2 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किडींच्या जैविक नियंत्रणासाठी कपाशीच्या पिकांमध्ये वीस पक्षी थांबे प्रती हेक्टरी उभारावेत. अशा पद्धतीने कपाशी पिकांवरील गुलाबी बोंड अळी व रसशोषक किडींचे नियंत्रण केल्यास कपाशीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.
Foreman lure trap चा उपयोग करून कीड नियंत्रण कसे केले जाते या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.
खालील प्रश्नांची उत्तरे बघा.
कपाशी बाजार भाव आता तरी नक्की सांगता येणार नाही परंतु १० ते १२ हजार प्रती क्विंटल दर या प्रमाणे मिळण्याची शक्यता आहे.
सध्या कापूस पिकास मिळत असलेला बाजार भाव लक्षात घेता कापूस उत्पादन वाढल्यास शेतकरी बांधवास याचा फायदा मिळेल. कापूस उत्पादन वाढविण्यासाठी काही बाबी या लेखामध्ये दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचा जेणे करून तुमच्या कापूस पिकांचा उत्पादनात वाढ होईल.
कपाशीवरील कीड नियंत्रण केले तर नक्कीच यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते? कीड नियंत्रण कसे करावे या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.