अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट म्हणून २ हजार रुपये मिळणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे.
२०२० व २०२१ या वर्षामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस तथा मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज म्हणून २ हजार रुपये दिवाळी भेट मिळणार होते. परंतु हि आर्थिक मदत प्रलंबित राहिलेली होती. तीच मदत आता दिली जाणार आहे. यासाठी निधीचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळी भाऊबीज भेट म्हणून जे २ हजार रुपये दिले जाणार होते त्यासाठी सदर प्रयोजनाकरिता 38 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला होता.
पुढील माहिती पण पहा. सौर पंपासाठी 15 कोटी निधी मंजूर आता लवकरच मिळणार सोलर पंप
अंगणवाडी सेविकांना मिळणार २ हजार रुपये.
सदर योजनेमधील वसमत जिल्हा हिंगोली, साकोली जिल्हा भंडारा व वेल्हे जिल्हा पुणे हे ग्रामीण प्रकल्प तसेच अचलपूर दर्यापूर हा नागरी प्रकल्प अशा चार प्रकल्पांमधील एकूण 907 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तांत्रिक कारणास्तव भाऊबीज भेट अदा करणे शक्य न झाल्याने त्यांना भाऊबीज भेट मिळालेली नव्हती.
सन 2020-21 च्या आर्थिक वर्षातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांची प्रलंबित राहिलेली दिवाळी भाऊबीज भेट अदा करण्यासाठी एकूण 907 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे एकूण 18.14 लक्ष एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका यांना मागीलवर्षी तांत्रिक कारणांमुळे दिवाळी सणानिमित्त शासनाकडून दिली जाणारी मदत मिळाली नव्हती त्यांना आता हि मदत लवकरच दिली जाणार आहे.
या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व शासन निर्णय म्हणजेच जी आर बघण्यासाठी येथे क्लिक करा.