दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ च्या जी आरमध्ये ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 grampanchyat gharkul yojana yadi आली असून यामध्ये कोणकोणत्या लाभार्थींचे नाव आहे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकाम मान्यता यादी आली असून लवकरच या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे.
जाणून घेवूयात कि कोणकोणत्या लाभार्थींचे नावे या घरकुल योजना यादीमध्ये आलेली आहेत.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत ज्या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी निधी मिळणार आहे त्यांची यादी या लेखाचं सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हि यादी बघू शकता.
पुढील योजना पण बघा घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणार शिंदे सरकारचा निर्णय
ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 लाभार्थींची आली नावे जी आर पहा.
ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे सर्वसाधारण नागरिकांना घरकुल बांधणे शक्य होते. त्यामुळे अनेकजण आपल्याला घरकुल कधी मिळेल याकडे लक्ष ठेवून असतात.
अर्थात घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर तुमचे नाव घरकुल योजना यादीमध्ये येणे गरजेचे असते. या यादीमध्ये तुमचे नाव आले कि मग शासनाच्या नियम व अटीनुसार लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.
दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. याच जी आरमध्ये हि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकाम मान्यता यादी देण्यात आलेली आहे. जी आर च्या सर्वात शेवटच्या पेजवर हि यादी दिलेली आहे. खालील बटनावर क्लिक करा आणि जी आर बघून घ्या.
या जी आरच्या सर्वात शेवटी म्हणजेच शेवटच्या पानावर कोणकोणत्या लाभार्थींचे नावे या यादीत आलेली आहेत ते तुम्ही जाणून घेवू शकता.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत हि घरकुल योजना यादी आहे. प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत देखील लाभार्थ्यांना घरकुल योजना दिली जाते.
मोबाईलवर बघा घरकुल योजनेची यादी.
प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत यादी तुम्ही तुमची मोबाईलवर देखील बघू शकता. घरकुल योजना यादी बघण्यासी पद्धत कशी आहे त्या संदर्भातील व्हिडीओ देखील तुम्ही बघू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ग्रामीण भागातील अनेकांना घरकुल योजनेची नितांत गरज असते. परंतु घरकुल यादीमध्ये नाव येण्यासाठी एक पद्धत असते. घरकुल योजनेचा अगोदर सर्वे केला जातो आणि मग तुमचे नाव या घरकुल यादीमध्ये समाविष्ट केले जाते.
तुमचे नाव जर अजूनही घरकुल योजनेमध्ये नसेल तर घरकुल योजनेच्या अधिक माहितीसाठी तुमच्या ग्राम पंचायतला संपर्क साधा किंवा तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता आणि घरकुल योजना संदर्भात अधिकची माहिती मिळवू शकता.