बांधकाम कामगार नोदणी 1 रुपयात केली जाणार आहे. या संदर्भात कामगार मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. बांधकाम कामगारांना यापुढे नोंदणी करण्यासाठी आता केवळ एक रुपया लागणार आहे. आता एक रुपयामध्ये बांधकाम कामगार नोंदणी करता येणार असल्याची माहिती राज्याचे कामगार सुरेश खडे यांनी दिली आहे.
राज्यातील संघटित कामगारांना म्हणजेच ज्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली आहे अशा कामगारांना हक्काचे घरकुल देण्यासाठी कामगार विभागामार्फत लवकरच घरकुल योजना राबविण्यात येणार आहे.
बांधकाम कामगार घरकुल योजनेअंतर्गत कामगार विभागाकडून दोन लाख तर प्रधानमंत्री आवास योजनेतून अडीच लाख असे एकूण साडेचार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामगार भवन, कामगार विमा रुग्णालय व क्रीडा संकुल बांधण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील ट्विट बघा
कामगार नोंदणीकरण्यासाठी पूर्वी लागणारे २५ रुपये शुल्कामधील २४ रुपये कपात करण्यात आले असून आता केवळ नाममात्र १ रुपयामध्ये हि नोंदणी केली जाणार आहे.
पुढील योजना पण बघा ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 आली यादीत पहा तुमचे नाव
बांधकाम कामगार नोदणी 1 रुपयात कामगारांना मिळणार घरे
प्रत्येक जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना प्रभावीपणे यापुढे राबविली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही अजूनही तुमची नोंदणी केली नसेल तर लगेच बांधकाम कामगार म्हणून नोंदणी ऑनलाईन करून घ्या.
कारण यापुढे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना खूप मोठा फायदा होणार आहे. बांधकाम कामगारांना केवळ घरेच नाहीत तर इतर देखील विविध प्रकारच्या सुविधा मिळतात.
बांधकाम कामगार नोंदणी करणे खूपच सोपे आहे. तुम्ही अगदी तुमच्या मोबाईल फोनवरून ही नोंदणी करू शकता. बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी लागते या संदर्भातील संपूर्ण मार्गदर्शन असलेला व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कामगार नोंदणीचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे टच करा.
कामगार नोंदणी करण्यासाठी आता द्यावे लागणार नाही अतिरिक्त पैसे
राज्यामध्ये बांधकाम कामगारांच्या समस्या खूप मोठ्या आहेत. अनेक कामगार असे आहेत जे बांधकाम काम तर करतात परंतु अजूनही त्यांनी त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नाही.
अनेक बांधकाम कामगारांना नोंदणी कशी करावी या बद्दल सविस्तर माहिती नसते. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी काही ठिकाणी बांधकाम कामगारांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतात आणि नोदणी करून घ्यावी लागते.
आता बांधकाम कामगार नोंदणी अधिकृतपणे फक्त २५ रुपये एवढे शुल्क यापूर्वी अर्जदारास द्यावे लागत होते. परंतु यापुढे आता हीच नोंदणी करण्यासाठी केवळ १ रुपया एवढा शुल्क लागणार आहे.
बांधकाम कामगार नोदणी 1 रुपयामध्ये होणार असल्याने अनेक कामगारांना आता त्यांची नोंदणी करणे शक्य होणार असल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी दिली आहे.
व्हिडीओ पहा
ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी पूर्वी २५ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते. हे शुल्क आता कमी करण्यात आले असून यापुढे बांधकाम नोंदणी करण्यासाठी केवळ १ रुपया एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे.
मोबाईलचा उपयोग करून देखील ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी करता येणार आहे.
बांधकाम कामगारांना घरकुल बांधकाम योजना व्यतिरिक्त इतर विविध योजनांचा लाभ मिळतो. कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो हे जाणून घेण्यासाठी लेख काळजी पूर्वक वाचा.