शासनाची अतिवृष्टी नवीन यादी आली असून यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत शासन निर्णय जरी करण्यात आलेला आहे. जाणून घेवूयात या संदर्भात सविस्तर माहिती.
ज्या प्रमाणे जुलै 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेली पिक नुकसानभरपाई शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली होती अगदी त्याच पद्धतीने सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ महिन्यामध्ये झालेल्या पिक नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील कापूस सोयाबीन मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे देखील करण्यात आले होते यानुसार अशा शेतकरी बांधवाना आता लवकरच त्याच्या बँक खात्यावर नुकसानभरपाई रक्कम जमा केली जाणार आहे.
पुढील योजना पण पहा विहीर अनुदान योजना सुरु मागेल त्याला मिळेल विहीर 4 लाख अनुदान
जी आर सोबत अतिवृष्टी नवीन यादी दिलेली आहे.
अतिवृष्टी नुकसानभरपाई देण्यासंदर्भात शासनाच्या वतीने नवीन जी आर जारी करण्यात आलेला आहे. या जी आर सोबत ज्या जिल्ह्यांना नुकसानभरपाई मदत देण्यात येणार आहे त्या जिल्ह्याची यादी देण्यात आलेली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती.
अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकरी बांधवांच्या निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
अ.क्र. | बाब | प्रचलित दर | मदतीचे वाढीव दर |
---|---|---|---|
1 | जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मिळणारी मदत | ६८०० (सहा हजार आठशे प्रति हेक्टर) दोन हेक्टर च्या मर्यादेत | १३६०० प्रती हेक्टर, ३ हेक्टरच्या मर्यादेत |
2 | बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मिळणारी मदत | १३५०० प्रती हेक्टर २ हेक्टरच्या मर्यादेत | २७,००० प्रती हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित |
3 | बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मिळणारी मदत | १८००० प्रती हेक्टर २ हेक्टरच्या मर्यादेत. | ३६,००० प्रती हेक्टर ३ हेक्टर च्या मर्यादित |
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ अतिवृष्टी नुकसानभरपाई
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण 128674.66 बाराशे श्येंशी कोटी चौऱ्यात्तर लक्ष सहासष्ट हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली.
नुकसानभरपाई यादी या जी आर सोबत दिलेली आहे. खालील लिंकवर क्लिक करून जी आर बघा. जी आरच्या सर्वात सर्वात शेवटी यादी देण्यात आलेली आहे.
तर शेतकरी बंधुंनो अशा पद्धतीने हि अतिवृष्टी नवीन यादी आलेली आहे आणि यामुळे शेतकरी बांधवाना पिक नुकसानभरपाई मदत दिली जाणार आहे.