जाणून घेवूयात मुख्यमंत्री रोजगार योजना संदर्भात माहिती mukhyamantri rojgar yojana. नोकरी नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहेत. अशा तरुणांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा आहे परंतु भांडवला अभावी ते तो व्यवसाय करू शकत नाहीत.
आता शासनाच्या वतीने अशा बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शासनाच्या या योजनेचा नाव आहे मुख्यमंत्री रोजगार योजना mukhyamantri rojgar yojana होय. जाणून घेवूयात या योजनेविषयी सविस्तर माहिती जेणे करून ग्रामीण भागातील तरुण या योजनेचा लाभ घेवू शकतील.
शहरी तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात.
मुख्यमंत्री रोजगार योजना mukhyamantri rojgar yojana ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमध्ये १० लाखापासून ते 50 लाखापर्यंत कर्ज मिळवण्याची व्यवस्था आहे.
लॉकडाऊनमुळे मागील एक दोन वर्षामध्ये अनेकांची नोकरी व व्यवसाय गेल्याने परत एकदा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे.
काय आहे मुख्यमंत्री रोजगार योजना
बहुतांश तरुण सुशिक्षित आहेत मात्र त्यांच्या हाताला काम नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर बहुतांश तरुण व तरुणी स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही.
अशा तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये तरुणांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
महाराष्ट्र राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यामध्ये निर्माण होत असलेल्या रोजगार व स्वयं रोजगाराच्या नवनवीन संधी विचारात घेवून शासनाने हि सर्वसमावेशक योजना सुरु केलेली आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो
या मुख्यमंत्री रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेली स्थानिक रहिवासींचे वय 18 वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त 45 वर्षे असावे.
10 लाख रुपयांवरील प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता सातवी उत्तीर्ण व 25 लाख रुपयांवरील प्रकल्पासाठी इयत्ता दहावी पास असणे आवश्यक आहे.
पुढील पाच वर्षामध्ये सुमारे १ लक्ष सूक्ष्म व लघु उपक्रम स्थापीत करणे. या उपक्रमाच्या माध्यमातून १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होऊ शकते.
या योजना संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर म्हणजेच लिंकवर क्लिक करा. जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, योजनेच्या अटी कोणत्या आहेत, कोणत्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत हि आणि या योजनेविषयी इतर A टू Z संपूर्ण माहिती मिळेल.
त्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.