सौर कृषी पंप योजना फसव्या लिंकपासून सावधान पहा किती आहे किंमत

सौर कृषी पंप योजना फसव्या लिंकपासून सावधान पहा किती आहे किंमत

सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र solar pump scheme संदर्भात सोशल माध्यमांवर येणाऱ्या फसव्या लिंकपासून सावधान राहा जेणे करून तुमची फसवणूक होणार नाही.

अगदी जीवाचे रान करून शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये पिक घेत असतात. पिक बहरत असताना नेमके त्या वेळी लोडशेडींग मुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. अशावेळी तुमच्याकडे सौर उर्जेवर आधारित कृषी पंप असेल तर हव्या त्या वेळी दिवसा पिकांना पाणी देणे शक्य होते.

WhatsApp Group
WhatsApp Group

पाहिजे त्या वेळी आणि दिवसा पिकांना पाणी देणे शक्य होत असल्याने अनेक शेतकरी बांधव शासकीय अनुदानावर सोलर पंप घेण्यासाठी इच्छुक आहेत. सोलर पंप अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे आणि कसा करावा या संदर्भात अनेक शेतकरी बांधवाना माहिती असते परंतु काही शेतकरी बांधवाना अजूनदेखील सौर कृषी पंप योजना संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते.

ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध असा करा अर्ज

सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र संदर्भात फसव्या लिंकवर क्लिक करू नये.

शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची आवश्यकता असल्याने काही फसव्या लिंक हल्ली फेसबुक, WhatsApp व इतर समाज माध्यमांवर येताना दिसतात. या लिंकवर क्लिक करून शेतकरी बांधवाना अर्ज करण्यास सांगितले जाते.

अर्ज केल्यावर अमुक एक रक्कम भरा म्हणून शेतकरी बांधवांकडे आग्रह केला जातो आणि ज्या शेतकरी बांधवाना या योजनेविषयी माहिती नसते ते शेतकरी बांधव अशा फसव्या लिंकवर क्लिक करून अर्ज भारतात आणि पैसे देखील देतात.

नंतर आपली फसवणूक झाली असल्याचे शेतकरी बांधवांच्या लक्षात येते परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आम्ही तुम्हाला सौर कृषी पंप मिळवून देतो त्यासाठी अमुक एका नंबरवर पैसे पाठवा अशी विनंती केली जाते आणि शेतकरी बंधवाची फसवणूक केली जाते त्यामुळे सौर कृषी पंप योजना संदर्भात सावधान राहा

व्हिडीओ पहा

सौर कृषी पंपा योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी बांधवानी अशा फसव्या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर केले आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शेतीसाठी सौर कृषी पंपाची आवश्यकता असेल तर सावध व्हा. कोणत्याही फसव्या लिंकवर क्लिक करून पैसे देवू नका नसता तुमची फसवणूक होऊ शकते.

सौर कृषी पंपाचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस आगावू रकम देवू नये. एससी व एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ५ टक्के व सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना १० टक्के स्वहिस्सा भरावा लागतो. या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही.

पुढील लेख पहा Solar panels for home सोलर सिस्टीम घरावर लावा वीजबिल मुक्त व्हा

जागरूक व्हा आणि जाणून घ्या सौर कृषी पंप योजना संदर्भातील माहिती.

शेतकरी बांधवाना शेतीसाठी मुबलक आणि सहज वीज मिळावी यासाठी पूर्वी केंद्र शासनाकडून  अटल सौर पंप योजना राबविली जात होती.

याच धर्तीवर नंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्यात आली. शेतकरी बांधवाना आता कुसुम योजना अंतर्गत सौर कृषी पंप दिले जातात.

सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवाना ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि हा ऑनलाईन अर्ज केवळ महा उर्जाच्या वेबसाईटवरच करता येतो.

इतर ठिकाणी कुसुम योजनेसाठी अर्ज अर्ज करता येत नाही त्यामुळे इतर कोणत्याही लिंकवर क्लिक न करता शेतकरी बांधवानी महा उर्जावेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर कारवाफ अशी सूचना शासनाकडून देण्यात आलेली आहे.

सोलर पंपाची किंमत

कोणत्या सौर पंपाची किती किंमत आहे आहे हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. जाणून घेवूयात कोणत्या प्रवर्गासाठी सौर पंपाचे किती अनुदान मिळते.

सौर कृषी पंपाची किंमत

तीन प्रकारचे सोलर पंप शेतकरी बांधवाना दिले जातात 3 एच पी ( डीसी) 5 एच पी ( डीसी) 7.5 एच पी ( डीसी).

3 एच पी ( डीसी) -193803

5 एच पी ( डीसी) – 269746

7.5 एच पी ( डीसी) – 374402

Maharashtra solar pump yojana online application

कृषी पंपासाठी खालील प्रमाणे जमीन शेतकरी बांधवांकडे असणे आवश्यक आहे.

3 HP- 2.50 एकर जमीन असणे आवश्यक.

5 HP – 2.51 ते 5.00 एकर जमीन आवश्यक.

7.5HP – 5.00 एकर पेक्षा जास्त जमीन असणे आवश्यक आहे.

3, 5 व 7.5 सौर कृषी पंपासाठी वेगवेगळी रक्कम भरावी लागते.     

3 HP DC

ओपन / खुला प्रवर्गासाठी – 19380

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी – 9690

5 HP DC

बऱ्याच जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध पहा यादी

ओपन / खुला प्रवर्गासाठी – 26975

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी – 13,488

7.5 HP DC

ओपन / खुला प्रवर्गासाठी – 37440

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी – 18720

तर अशा पद्धतीने शेतकरी बंधुंनो कोणत्याही फसव्या लिंकवर क्लिक करून सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *