महात्मा फुले कर्ज माफी योजनेची दुसरी यादी आली असून हि यादी pdf मध्ये डाउनलोड कशी करावी या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
ज्या शेतकरी बांधवानी बँकेचे नियमित कर्ज फेडलेले आहेत अशा शेतकरी बांधवाना शासनाच्या वतीने ५० हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.
ज्या शेतकरी बांधवाना या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांची पहिली यादी या अगोदरच आलेली आहे. अनेक शेतकरी बांधवाना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागलेली होती. आता कर्ज माफी योजनेची दुसरी यादी आलेली आहे.
या यादीमध्ये तुमचे नाव आलेले असेल तर लगेच जवळच्या सीएससी सेंटरवर जावून आधार प्रामाणिकरण करून घ्या. जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
तर जाणून घ्या कशा पद्धतीने कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 PDF डाउनलोड केली जाते आणि या यादीमध्ये तुमचे नाव कसे बघावे लागते.
शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई देखील मिळणार आहे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
महात्मा फुले कर्ज माफी यादी डाउनलोड करण्याची पद्धत
- गुगलच्या सर्च बारमध्ये टाईप करा डिजिटल सेवा
- डिजिटल सेवा पोर्टल ओपन झाल्यावर सीएससी आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- डिजिटल सेवा पोर्टल लॉगीन केल्यावर सर्च बारमध्ये Mahatma jyotirao fule karj mafi yojana असा कीवर्ड टाईप करा.
- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज माफी योजनेचे आणखी एकज पोर्टल ओपन होईल.
- या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे नाव दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा तालुका निवडा किंवा फिल्टरमध्ये तुम्हाला ज्या गावाची लिस्ट हवी असेल तो टाईप करा.
- ज्या गावाची महात्मा फुले कर्ज माफी यादी हवी असेल त्यावर क्लिक करा आणि डाउनलोड या पर्यायावर क्लिक करून यादी pdf मध्ये डाउनलोड करून घ्या.
या संदर्भातील व्हिडीओ बघून देखील तुम्ही कर्ज माफी यादी pdf मध्ये डाउनलोड करू शकता.
खालील व्हिडीओ पहा.
कर्जमाफी यादी डाउनलोड कशी करावी हे खालील व्हिडीओमध्ये अगदी सविस्तरपणे दिलेले आहे. त्यासाठी खालील व्हिडीओ नक्की बघा.
अर्थातच सगळ्याच शेतकरी बांधवांकडे सीएससी आयडी असेलच असे नाही. जर तुमच्याकडे सीएससी आयडी नसेल तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट देवून तुमचे नाव या यादीत असल्याची खात्री करून घ्या.
जर तुमचे नाव कर्ज माफी यादीत असेल तर आधार प्रामाणीकरण करून घ्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
महात्मा फुले कर्ज माफी योजनेत नाव आहे किंवा नाही हे बघण्यासाठी यादी डाउनलोड करावी किंवा ऑनलाईन बघावे.
कर्ज माफीची यादी pdf मध्ये डाउनलोड करता येते. हि यादी डाउनलोड कशी करावी या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. लेख संपूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.
तुमचे जर कर्ज माफी यादीत नाव आले तर त्यानंतर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागते.
कर्ज माफी योजेंचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरवर जावून शेतकरी बांधव प्रमाणीकरण करू शकतात.