शिवसेना कोणाची या संदर्भात आज संध्याकाळी 4 वाजता महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
साध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतर आमदार आणि खासदारांना सोबत घेवून शिवसेनेला खिंडार पाडले. संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी धनुष्यबाण या निशाणीवर दावा केलेला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना कोणाची आहे यावर बऱ्याच दिवसापासून वाद सुरु आहे. सोबतच शिवसेनेची निशाणी असलेले धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळेल या संदर्भात उत्सुकता लागलेली आहे.
शिवसेना पक्ष कोणाचा ठरणार तसेच धनुष्यबाण निशाण कोणत्या पक्षाला मिळणार या संदर्भात १७ जानेवारीला म्हणजेच आज दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगामध्ये याबाबत सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी झाल्यानतर कळेल कि धनुष्यबाण निशाणी नेमकी कोणाला मिळणार आहे उद्धव ठाकरे कि एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यापासून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या वतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
शिवसेना आणि कॉंग्रेस युती अभद्र होती शिवाय भाजपा शिवसेना युती असल्याने जनतेने निवडून दिले असल्याने आपण कोणतेही अनुचित काम केलेले नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी वारंवार जाहीर केलेले आहे.
पुढील लेख पण वाचा घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणार शिंदे सरकारचा निर्णय
त्यामुळे पक्ष चिन्हासाठी सुरु असलेला या वादावर नेमका काय तोडगा निघतो यावर संपूर्ण महाराष्ट्रासहित देशाचे लक्ष लागलेले आहे तसेच शिवसेना कोणाची हा निकाल देखील लागणार आहे.
सरकार कोणाचेही असोत त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्याची प्रगती होणे आवश्यक आहे. राज्यातील जनतेला सर्व काही कळते. कोणी विश्वास घात केला किंवा कोणी विकास केला याची जन आता चांगल्या पद्धतीने नागरिकांना कळत असल्याने लवकरच ते मतदान पेटीतून त्यांची जागा दाखवून देतील.