जाणून घेवूयात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.
बऱ्याच वेळा विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी या गावातून त्या गावात स्थलांतर करत असतात. अशा घटकांसाठी शासनाच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत घरकुल उपलब्ध करून दिले जाते.
भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना yashwantrao chavan mukta vasahat yojanaअंतर्गत घर बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात येते. शिवाय घर बांधण्यासाठी देखील निधी दिला जातो.
भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना या योजना संदर्भात अधिक माहिती नसण्याची शक्यता असते. त्यामुळे या योजनेपासून असे नागरिक वंचित देखील राहू शकतात.
आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत कि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना काय आहे. अर्ज कोठे करावा लागतो आणि यासाठी पात्र व्यक्ती कोणत्या आहेत.
पुढील माहितीपण वाचा ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 आली यादीत पहा तुमचे नाव
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत मिळेल हक्काचे घर
घर हि अशी वस्तू आहे जी प्रत्येकाला गरजेची आहे त्यामुळे आपल्या हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु समाजातील काही गरीब व्यक्तीना हे घरकुल बांधणे शक्य होत नसल्याने शासनाकडून अशा नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी जागा आणि अनुदान देखील देण्यात येते.
भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजना अंतर्गत दिव्यांग महिला, पूरग्रस्त कुटुंब, दारिद्र रेषेखालील कुटुंब तसेच परितक्त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
खालील व्हिडीओ पहा.
शासनच्या या योजनेचा लाभ मिळाल्याने भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना हक्काचे घर मिळते शिवाय रोजगारांच्या संधी देखील शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातात.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे करावा लागतो अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून हि योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला तालुक्याच्या समाज कल्याण विभागामध्ये अर्ज दाखल करणे गरजेचे आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना संदर्भातील अधिकची माहिती देखील समाज कल्याण कार्यालयात मिळू शकते.
बऱ्याच वेळेस नागरिकांना योजना तर माहित असते परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो या संदर्भात माहिती नसते. त्यामुळे काही नागरिक अशा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असते.
त्यामुळे तुम्ही जर या योजना अंतर्गत पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयास भेट देवून या योजना संदर्भात अधिक माहिती मिळवा जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला जाणून घ्यायचे असेल कि यशवंतराव चव्हाण योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- भूमिहीन प्रमाणपत्र.
वरील मुख्य कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक असतात.
योजनेच्या उद्देश
विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांचे राहणीमान उंचावे, त्यांचे उत्पन्न स्त्रोत वाढावे तसेच त्यांना स्थिरता प्राप्त करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
योजनेसाठी अटी खालीलप्रमाणे असणार आहेत.
ज्या कुटुंबाना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती भटक्या जमाती या मुळ प्रवर्गातील असणे गरजेचे आहे तसेच हे कुटुंब गावोगावी भटकंती करून उदरनिर्वाह करणारे असणे देखील गरजेचे आहे.
1.20 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे. तसेच लाभार्थी कुटुंब हे बेघर असावे तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
खालील प्रमाणे राबविली जाते हि योजना.
या योजना अंतर्गत खेडेगावातील भागामध्ये 20 कुटूंबासाठी एक वस्ती तयार केली जाते. निर्माण केलेल्या या वस्तीस किंवा वसाहतीस पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सेप्टींक टँक गटारे व रस्ते अशा प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात.
ज्या लाभार्थ्यांने सद्यस्थितीत कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा लाभार्थीस स्वत:ची जागा असेल तरी लाभ दिला जातो.
कधी कधी योजनेचा लाभ घेण्यासाठी जागा मिळत नाही व मिळाली तर भरपूर मिळते अशा वेळी पुरेशी जागा मिळाली तर सामुहिकरित्या आणि कमी जागा असेल तर वैयक्तिकरित्या लाभ दिला जातो.
लाभार्थी जर डोंगराळ भागातील असेल तर 1.30 लाख रुपये व सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थी असेल तर 1.20 लाख रुपये अनुदान दिले जाते.
मुक्त वसाहत योजना संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.