लिंबू 11 हजार रुपये प्रती क्विंटल झाले असून या संदर्भात या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेवूयात.
शेतकरी बंधुंनो नमस्कार शेती फायद्यामध्ये आणायची असेल तर त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देवून शेतीमध्ये नवीन पिक पद्धत अवलंबायला हवी.
सध्या मार्केटमध्ये कोणत्या पिकला मागणी आहे या संदर्भात माहिती घेवून जर पिक घेतले तर नक्कीच शेती फायद्याची होऊ शकेल.
अनेक शेतकरी बांधव फळबाग पिकांकडे वळलेले आहेत परंतु काही फळबागा देखील सध्या तोट्यात गेल्याने शेतकरी बांधवाना हवा तसा फायदा मिळाला नाही. पिक पद्धतीचा अवलंब करण्याआधी त्या संदर्भात सविस्तर माहिती घेणे गरजेचे ठरते.
फळबाग म्हटले कि आंबा, डाळिंब, मोसंबी सीताफळ इत्यादी फळ पिके नजरेसमोर येतात. परंतु याही पलीकडे जावून अजून थोडी माहिती घेतली तर लिंबाच्या फळबागा इतर फळबागांच्या तुलनेत कमी आढळतात.
लिंबू 11 हजार रुपये प्रती क्विंटल
अर्थशास्त्राच्या नियमानुसार ज्या वस्तूची मागणी वाढते त्याच्या किमतीत देखील वाढ होते. हे सर्व माहिती सांगण्याचे कारण म्हणजे सध्या लिंबाला ११ हजार प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे.
सध्या उन्हाळा सुरु आहे आणि उन्हाळ्यामध्ये लिंबाला खूपच मागणी होत आहे. लिंबाची मागणी वाढल्याने आपसूकच बाजार भाव देखील वाढला आहे.
मागील वर्षी लिंबाला प्रति किलो दोनशे रुपये दर मिळाला होता. व्यापारी तर थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत लिंबाला 3 हजारापासून 11000 पर्यंत दर मिळत आहे. सरासरी म्हणाल तर लिंबाला सात हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
पारंपारिक पिक पद्धत बदलणे आवश्यक
पारंपारिक फळबाग पिकांमध्ये जास्त नफा मिळू शकतो. त्यातच लिंबाला सध्या चांगला बाजार भाव मिळत असल्याने ज्या शेतकरी बांधवांकडे लिंबाची बाग आहे त्यांना तर चांगले दिवस आले आहेत.
तुमच्याकडे देखील शेती असेल तर पारंपारिक पिकांना फाटा देवून तुम्ही फळबागेकडे वळू शकता. फळबाग लागवड करण्यासाठी शासनाकडून सबसिडी देखील मिळते.
शिवाय तुमच्याकडे फळबाग असेल तर त्यासाठी पिक विमा देखील चांगला मिळतो त्यामुळे फळबाग शेतकरी नफ्यामध्ये असतात.
फळबागेसाठी मिळते शासकीय अनुदान
फळबागेसाठी किती अनुदान मिळते कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो किती सबसिडी मिळते या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही फळबाग योजना संदर्भात सविस्तर माहिती मिळवू शकता जेणे करून तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ मिळू शकेल.