कुसुम योजनेची वेबसाईट सुरु झाली असून आता सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. जाणून घेवूयात सविस्तर माहिती या लेखामध्ये.
कुसुम सौर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याही लिंक बंद होती ती आता सुरु झालेली आहे. हि लिंक पुन्हा बंध होण्याच्या आधी तुम्ही तुमचा सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
काही दिवसापासून महाउर्जा वेबसाईटवर सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन अर्जाची लिंक बंद होती. काही तांत्रिक कारणामुळे हि वेबसाईट बंध होती.
परंतु आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पुन्हा सुरु झालेली आहे.
सोलर पंप किंमत जाणून घ्या किती आहे किती भरावी लागणार
कुसुम योजनेची वेबसाईट सुरु झाल्याने करता येणार ऑनलाईन अर्ज
महाउर्जावरील कुसुम योजनेची ऑनलाईन अर्ज लिंक बंद असल्याने अनेक शेतकरी बांधव हि लिंक पुन्हा सुरु होण्याची आतुरतेने वाट बघत होते त्यामुळे हि लिंक आता पुन्हा सुरु झाल्याने सौर कृषी पंप योजनेचा अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला कुसुम सौर योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करून द्या. कारण महाउर्जा वेबसाईट ट्राफिक जास्त झाले तर पुन्हा हि लिंक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुसुम योजना अंतर्गत करता येतो सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
शेतकरी बांधवाना सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महाउर्जाच्या वेबसाईटवरील दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.
सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या सीएससी किंवा ऑनलाईन सेंटरवर जावून अर्ज करावा लागतो. परंतु तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तुम्ही स्वतः देखील हा अर्ज सादर करू शकता. शेतकरी स्वतः ऑनलाईन अर्ज कसा करू शकतात.
ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
तर शेतकरी बंधुंनो कुसुम सोलर पंप योजनेची लिंक पुन्हा एकदा सुरु झाली असून लगेच तुमचा सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर करून द्या जेणे करून तुम्हाला कुसुम सौर पंप योजनेचा लाभ घेता येईल.
सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.