फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना.
राज्यातील गरीब नागरिक जर आजारी पडले तर त्यांना आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभ दिला जातो त्यामुळे त्यांचा दवाखान्याचा खर्च कमी होऊन आर्थिक सहाय्य मिळते.
सर्वसामान्य जनतेसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण यापुढे आता आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रपणे राबविण्यात येणार आहे.
योजना एकत्र राबविली जाणार आहे शिवाय जे नागरिक या योजनांतर्गत पात्र आहे त्यांना संयुक्त कार्ड देखील देण्यात येणार आहेत.
जे नागरिक आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना ऑपरेशनसाठी पाच लाख रुपये शिवाय उपचारासाठी सहाय्य केले जाणार आहे.
आयुष्मान भारत योजना यादी pdf अशी करा डाउनलोड पहा तुमचे नाव
मोफत करा कार्ड डाउनलोड
एखाद्या आजारावर उपचार केल्यानंतर त्यासाठी लागणारी औषधी खरेदी करण्यासाठी गरीब नागरिकांकडे पैसा नसतो. अशावेळी जनऔषधी केंद्रामधून हि औषधी घेतल्यास स्वस्त मिळते. त्यामुळे जनऔषधी केंद्रे अधिक संख्येने उघडण्यात येणार असून त्यातून नागरिकांना स्वस्त दरामध्ये उपचारासाठी लागणारी औषधी उपलब्ध होणार आहे.
जनऔषधी केंद्र आणि इतर खाजगी मेडिकल मधील औषधींची जर तुलना केली तर हि औषधी निम्या किमतीत मिळणार आहे म्हणजेच इतर मेडिकल मधील औषधीपेक्षा हि औषधी ५० टक्क्यांनी स्वस्त असणार आहे.
एवढेच नव्हे तर तुमच्या गावातील अशा वर्कर तुम्हाला हे कार्ड डाउनलोड करून देण्यास मदत करणार आहे. यासाठी मात्र त्यांना ५ रुपये द्यावे लागणार आहेत. नागरिक आयुष्यमान कार्ड मोफत देखील डाउनलोड करू शकतात.
आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड मोफत डाउनलोड कसे करावे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. खालील लिंकमध्ये महत्वाच्या माहितीसह व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे.
तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड अगदी काही मिनिटांमध्ये डाऊनलोड करू शकता.
आयुष्मान कार्ड डाउनलोड करा मोबाईलवर अगदी काही मिनिटांत
अधिकृत माहिती पहा
आयुष्यमान भारत योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्याला त्यांच्या आजारावर खर्च झालेल्या पैशांचे विवरण संदर्भातील संदेश पाठविले जाणार आहेत.
या संदर्भात नुकतीच मिटिंग आयोजित करण्यात आली होती यामध्ये हि माहिती देण्यात आलेली आहे.
नक्कीच शासनाची हि योजना सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी फायद्याची ठरेल अशी अशा करूयात. या संदर्भातील अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.