कांदा अनुदान यादी जिल्ह्यानुसार आली असून जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये कांदा या पिकास अत्यंत कमी भाव मिळाला परिणामी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते.
यामुळे अनेक शेतकऱ्यांसहित शेतकरी संघटनांनी शासनाकडे अनुदानाची मागणी केली होती. कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि शेतकऱ्याकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने लेट खरीप हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 465.99 कोटी रुपये अनुदान वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.
या संदर्भातील शासन निर्णय दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी महराष्ट्र राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
कांदा अनुदान यादी kanda anudan 2023
सन 2022-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 रुपये प्रति क्विंटल यानुसार अनुदान मिळणार असून जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी या प्रमाणे हे कांदा अनुदान मिळणार आहे.
म्हजेच एका शेतकरी बांधवास जास्तीत जास्त 70 हजार रुपये अनुदान मिळू शकते.
1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2018 दरम्यान ज्या शेतकरी बांधवाना कांदा विक्री करतांना खूप तोटा झाला अशा शेतकरी बांधवाना आता शासनाकडून अनुदान मिळणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागणारे अनुदान सर्वसाधारणपणे 844 कोटी एवढा निधी लागणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र शासनाने 465.99 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले आहे. या अनुदानातून तीन लाख 36 हजार 476 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १०० टक्के अनुदान
शासनाला राज्यातील 23 जिल्ह्यामधून कांदा अनुदान मागणी प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी तेरा जिल्ह्यातील अनुदानाची मागणी अल्प स्वरूपाचे असल्याने 13 जिल्ह्यातील सर्व पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाची रक्कम वितरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.
उर्वरित 10 जिल्ह्यांची मागणी जिल्हा निहाय दहा कोटी पेक्षा जास्त असल्याने या 10 जिल्ह्याचे सर्व पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 53.94 टक्केनुसार निधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे.
खालील योजना पण पहा
कांदाचाळ अनुदान वाढले रोजगार हमी मंत्र्यांनी दिली माहिती पहा किती मिळणार नवीन अनुदान
पहिल्या टप्प्यात 378 कोटी
दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची अनुदान मागणी दहा कोटी पेक्षा जास्त असल्याने पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील 378 कोटी 58 लाख 95 हजार 807 रुपये अनुदान मिळणार आहे. यामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे.
नाशिक.
उस्मानाबाद.
पुणे.
सोलापूर.
अहमदनगर.
औरंगाबाद.
धुळे.
जळगाव.
कोल्हापूर.
बीड या जिल्ह्याचा समावेश आहे.
शंभर टक्के कांदा अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.
13 जिल्ह्यातील पात्र कांदा उत्पादक लाभार्थ्यांची अनुदान मागणी अल्प स्वरूपाचे असल्यामुळे अशा शेतकरी बांधवाना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे.
खालील जिल्ह्यांचा समावेश
नागपूर.
रायगड.
सांगली.
सातारा.
ठाणे.
अमरावती.
बुलढाणा.
चंद्रपूर.
वर्धा.
लातूर.
यवतमाळ.
अकोला.
वाशिम.
सविस्तर माहितीसाठी तुम्ही शासन निर्णय म्हणजेच जी आर बघू शकता.
३५० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे एका शेतकऱ्यास २०० क्विंटल पर्यंत अनुदान मिळणार आहे.
दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी शासनाच्या वतीने निर्गमित केलेल्या जी आर सोबत हि यादी तुम्ही बघू शकता.