मुसळधार पाऊस पडणार वाचा सविस्तर माहिती. पावसाने दिलेल्या खंडामुळे विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशावेळी आता पाऊस आला नाही तर पिकांचे होत असलेल्या नुकसानीमध्ये अधिकच भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अशातच आता २१ ते २३ सप्टेंबर या तारखेदरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचे वर्तविण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
मागील काही दिवसांमध्ये मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला मात्र त्यामुळे विहिरी किंवा बोअरची पाणी पातळी हवी तशी वाढली नाही. त्यामुळे आता शेतकरी बांधवाना जोरदार पावसाची अपेक्षा लागलेली आहे.
बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana.
मुसळधार पाऊस पडणार हवामान विभागाचा अंदाज
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने मराठवाड्यात 21 ते 23 सप्टेंबर या काळात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.
सध्या मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. पावसाअभावी पिकांनी मना टाकल्या असून पिकांचे नुकसान होत आहे. अशावेळी मुंबई प्रादेशिक विभागाने दिलेल्या या हवामानामुळे शेतकरी बांधवाना दिलासा मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी