मिनी ट्रॅक्टर योजना 2023 mini tractor yojana अंतर्गत 3 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान मिळते व 35 हजार रुपये लाभार्थी हिस्सा म्हणून भरावे लागतात.
हि योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता. जाणून घेवूयात मिनी ट्रॅक्टर योजना 2023 mini tractor yojana
शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणत वाढला आहे. बऱ्याच शेतकरी बांधवाना मोठा ट्रॅक्टर खरेदी करणे परवडत नसल्याने मिनी ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे.
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळते उर्वरित १० टक्के निधी लाभार्थ्यांना भरायचा असतो. अनेक बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळालेला आहे.
pm kisan ekyc last date ईकेवायसी करण्याची नवीन शेवटची तारीख आली.
मिनी ट्रॅक्टर योजना 2023 संदर्भातील सविस्तर माहिती
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. मिनी ट्रॅक्टर योजना mini tractor yojana 2023 अंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत, अर्ज कोठे करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
शेतामध्ये विविध कामे करण्यासाठी मिनी ट्रॅक्टरचा खूपच उपयोग होतो. मिनी ट्रॅक्टर लहान असल्याने शेतामध्ये उपयोग करणे सोपे जाते. त्यामुळे या मिनी ट्रॅक्टरचा शेतामधील उपयोग सातत्याने वाढत आहे. मजुरांची समस्या लक्षात घेता अनेक कामे शेतामध्ये मिनी ट्रॅक्टरचा उपयोग केल्यास अधिक फायदा होतो शिवाय वेळेची बचत देखील होते.
यांना मिळेल मिनी ट्रॅक्टर योजना
- मिनी ट्रॅक्टर योजना हि केवळ अनुसूचित जाती व नऊ बौद्धासाठी लागू असते.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट असणे गरजेचे आहे.
- बचत गटामधील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे.
- मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत शासनाकडून 3 लाख 50 हजार अनुदान मिळते. हे अनुदान मिळविण्यासाठी स्व हिस्सा म्हणून 35 हजार रुपये अगोदर भरावे लागतात त्यानंतर हे अनुदान बचत गटांच्या अध्यक्ष व सचिव यांच्या नावे जमा केले जाते.
9 ते 18 अश्वशक्तीचे मिळणार मिनी ट्रॅक्टर
9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90% अनुदानावर वाटप करण्याची हि योजना आहे. हि योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. मिनी ट्रॅक्टर वाटपाचे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे उद्दिष्ट शकते.
जालना जिल्ह्याचा विचार केल्यास 2022-23 आर्थिक वर्षात मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत 35 मिनी ट्रॅक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटाकडून अर्ज मागण्यात आले होते.
या अर्जाची छाननी करून पात्र ठरलेल्या 99 बचत गटापैकी उद्दिष्टानुसार लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून लॉटरी पद्धतीने 35 स्वयंसहायता बचत गटाची निवड करण्यात आली.
तुमच्या गटाला जर मिनी ट्रॅक्टर हवा असेल तर त्यासाठी तुम्ही ज्या हि जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधून अर्ज सादर करून द्या.
अधिक माहितीसाठी शासनाच्या वेबसाईटला भेट द्या.
या योजनेसाठी शासनाकडून ३.५० लाख रुपये अनुदान मिळते. मात्र त्यासाठी स्वहिस्सा १० टक्के एवढा अगोदर भरावा लागतो त्यामुळे निव्वळ अनुदान ३.१५ लाख एवढे मिळते.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करू शकता.