जाणून घेवूयात बांधकाम कामगार पावती डाउनलोड करावी Bandhkam kamgar cash receipt download process
मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कि बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळत असतो. यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
1 रुपयात पिक विमा नोंदणी शेतीसाठी 12 तास दिवसा लाईट शेतकऱ्यांना प्रती वर्ष मिळणार 12 हजार रुपये
एकदा का अर्ज केला कि मग तुम्हाला बांधकाम कामगारांच्या ३२ योजनांचा लाभ मिळतो. सुरक्षा पेटी असेल किंवा बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती असेल कि मग लग्नासाठी अर्थसहाय्य असेल या आणि इतर विविध योजनाचा लाभ बांधकाम कामगारांना मिळत असतो.
त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे असते. आता केवळ १ रुपयात बांधकाम कामगार नोंदणी करता येते. नोदणी केल्यावर या सर्व योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. १ रुपयात बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ पहा.
बांधकाम कामगार पावती cash receipt डाउनलोड कशी करावी
- बांधकाम कामगार मंडळाची वेबसाईट ओपन करा.
- वेबसाईट ओपन झाल्यावर construction worker profile login हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि सध्यस्थितीत सुरु असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल तोच टाका जो तुम्ही नोंदणी करतांना टाकलेला होता. proceed to form या बटनावर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp पाठविला जाईल तो दिलेल्या चौकटीत टाका आणि validate otp या बटनावर क्लिक करा.
- आता तुम्ही लॉगीन झालेले आहात. पेजला खाली स्क्रोल करा.
- सर्वात शेवटी पेमेंट डीटेल्स हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- या ठिकाणी दोन पर्याय दिसतील Print cash receipt व print renewal receipt परंतु तुमची नवीन नोंदणी असेल तर तुम्हाला print renewal receipt हा पर्याय दिसणार नाही.
- Print cash receipt या पर्यायावर क्लिक करा. आता हि पावती ओपन होईल. तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असेल तर प्रिंट काढून घ्या. किंवा या पावतीला pdf format मध्ये सेव्ह करून घ्या आणि नंतर प्रिंट काढून घ्या.
- अशीच प्रोसेस renewal receipt सुद्धा करा.
तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपण जाणून घेतेलेले आहे कि बांधकाम कामगार पावती Bandhkam kamgar cash receipt किंवा रिन्युअल रीसिप्ट bandhkam kamgar renewal receipt डाउनलोड कशी करावी.