शेतीला जोड व्यवसाय म्हणून बोकड पालन व्यवसाय करत तरुणाने दिली शेतीला जोडव्यवसायाची साथ.
सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालेले आहे. ग्रामीण भागातील तरुणांचा विचार केला तर बेरोजगारीसह दुष्काळ अतिवृष्टी इत्यादी संकटे उभी ठाकलेली असतात.
अशावेळी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय केला तर नक्कीच शेतकरी बांधवांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील रमेश सोनवणे या युवकाने अगदी कमी जागेमध्ये आपला शेळी पालन व्यवसाय सुरु केला आहे.
सध्या ते फक्त बोकड विक्रीवर लक्ष केंद्रित करत असून यामध्ये जास्त नफा मिळविण्याचा त्यांचा मानस आहे.
नोकरी मिळाली नाही मग केला बोकड पालन व्यवसाय
रमेश सोनवणे या तरुणाने शासकीय नोकरीसाठी खूप प्रयत्न केले नोकरी काही लागली नाही. निराश न होता त्यांनी जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला.
कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जम बसल्यावर त्यांनी शेळी पालन व्यवसायामध्ये केवळ बोकड पालन व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घेवूयात त्यांच्याकडून.
बोकडाच्या मांसाला बाजारात खुप मोठी मागणी असते शिवाय शेळी पासून मिळणारे दुध मानवी आरोग्यास खूपच लाभदायक असते. यामुळे शेळीपालन हा सतत चालणार व्यवसाय आहे.
बोकड व्यवसायाचे नफ्याचे गणित
रमेश सोनवणे यांनी २ हजार रुपयाला एक असे सुरुवातीला २० बोकड खरेदी केले आहेत. २० बोकड खरेदी करून त्यांनी आपला व्यवसाय सुरु कलेला आहे. शिवाय त्यांना शेडसाठी ५० हजार रुपये खर्च देखील आलेला आहे. अगदी कमी जागेमध्ये त्यांनी आपला शेळीपालन व्यवसाय सुरु केलेला आहे.
रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खालावत चालला आहे. सेंद्रिय शेतीचे महत्व आता शेतकरी बांधवांच्या लक्षात आले असल्याने सेंद्रिय खताची मागणी देखील वाढू लागली आहे.
अशावेळी शेळीचे लेंडी खत हे उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत म्हणून काम करते.
शेळी पालन अनुदान योजना
शेळी पालन करण्यासाठी शासनाच्या विविध योजना असतात परंतु शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो.
रमेश सोनवणे यांनी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
तुम्हाला देखील शेळी पालन व्यवसाय करायचा असेल आणि यासाठी तुम्ही शासकीय अनुदान घेवू इच्छित असाल तर यासाठी विविध योजना सुरु असतात.
शेळी पालन योजना संदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती घेवू शकता.
नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत मिळणार शेळी मेंढी गाई म्हशी
रमेश सोनवणे यांचा संपर्क नंबर 7499165202