नेपाळमध्ये मोठा भूकंप मोठी वित्त व जीवितहानी Nepal earthquake today

नेपाळमध्ये मोठा भूकंप मोठी वित्त व जीवितहानी Nepal earthquake today

नेपाळमध्ये काल रात्री म्हणजेच शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री भूकंपाचे मोठे हादरे बसले Nepal earthquake today. हे भूकंपाचे धक्के मोठे असून रिक्टर स्केलवर याची ६.४ एवढी नोंद झाली.

नेपाळ मधील जाजरकोट या जिल्ह्यामध्ये जमिनीच्या खाली जवळपास १० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

या पश्चिम नेपाळ भूकंपामध्ये १२८ लोकांचा बळी गेला असून अनेक जन जखमी झालेले आहेत. रुकुम पश्चिममध्ये या भूकंपामुळे जवळपास ३५ लोकांचे बळी गेलेले असून एकट्या जाजरकोट जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ९० जणांचा बळी गेल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

नेपाळच्या पश्चिम भागामध्ये झालेल्या या भूकंपामुळे घरांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. शुक्रवारी रात्री जवळपास ११.३० वाजता झालेल्या या भूकंपामुळे पूर्ण देश हादरून गेलेला आहे.

नमो शेतकरी योजना हफ्ता मिळाला नाही. का मिळत नाही हफ्ता असे शोधा कारण namo shetkari sanman yojana 2023

नेपाळ भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ एवढी

Nepal earthquake today नेपाळमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ एवढी नोंदविली गेली आहे जी कि खूप मोठी आहे. या भूकंपामुळे भारत व चीनमध्ये देखील प्रभाव पडलेला आहे.

नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार शुक्रवारी रात्री हा भूकंप झाला आहे. काठमांडू हि नेपाळची राजधानी असून जाजरकोट येथे झालेल्या भूकंपाची झळा या शहराला देखील बसली आहे. काठमांडू येथील नागरिकांना देखील हा भूकंपाचा झटका जाणवला तेंव्हा अनेक नगरीक घराबाहेर पडून रस्त्यावर उतरलेले दिसले.

या भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून यातून सावरण्यासाठी नेपाळ येथील नागरिकांना नक्कीच वेळ लागणार आहे.

Nepal earthquake today पीएमओच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर माहिती

भुकंपासंदर्भात नेपाळच्या पीएमओच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर देखील या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात बळी गेलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त करण्यात आला आहे.

खालील ट्वीट बघा.

https://x.com/PM_nepal_/status/1720549046048403607?s=20

नेपाळमध्ये यापूर्वी अनेकदा भूकंपाचे झटके बसलेले आहेत. २०१५ या वर्षामध्ये ७.८ या तीव्रतेचे भूकंपाचे झटके बसले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणत नेपाळमध्ये जीवित हानी झाली होती तसेच मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले होते.

नेपाळ मध्ये झालेल्या भूकंपामुळे जी हानी झाली आहे ती पूर्णपणे रिकव्हर करण्याचे काम मोठ्या प्रमाणत सुरु आहे. या भूकंपामुळे घरांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून अनेक नागरिक बेघर झालेले आहेत.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *