पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर त्यासाठी 1 हजार रुपये फीस भरावी लागणार आहे. पॅन कार्डला आधार लिंक करणे यापूर्वी मोफत होते. 30 जून 2023 हि मोफत पॅन कार्ड व आधार लिंक करण्याची शेवटची तारीख होती ती केंव्हाची संपलेली आहे. आता आधार व पॅन कार्ड लिंक करणे महागात पडत आहे.
ज्यावेळेस हि सुविधा मोफत होती त्यावेळी बऱ्याच नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले आता त्यांचे लिंक करणे बाकी आहे त्यांना शासनाला १ हजार रुपये एवढी फी भरणे बंधनकारक आहे.
तुम्ही जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर शासकीय योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणारच नाही.
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर ते कसे ऑनलाईन कसे तपासावे चला जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
उद्योग कर्ज योजना ९० टक्के कर्ज मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का हे खालील पद्धतीचा अवलंब करून तपासून घ्या
- इनकमटॅक्स विभागाच्या ई फिलिंग या पोर्टलला भेट द्या.
- ई फिलिंग पोर्टल ओपन झाल्यावर कॉम्प्युटर स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या नेव्हिगेशन बारवर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला लिंक आधार स्टेट्स असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- जसेही तुम्ही लिंक आधार स्टेट्स या बटनावर पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी आधार आणि पॅन नंबर आणि आधार नंबर सादर करण्याचे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. दिलेल्या चौकटीत पॅन आणि आधार नंबर टाका.
- view link adhar status या बटनावर क्लिक करा.
तुमचे पॅन कार्ड जर आधारशी लिंक असेल तर त्या संदर्भातील संदेश तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. मात्र पॅन नंबर व आधार नंबर एकमेकांशी लिंक नसेल तर मात्र तुम्हाला १ हजार रुपये शुल्क भरून लिंक करून घ्यावे लागणार आहे.
पॅन नंबरला आधार लिंक करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- परत एकदा इ फिलिंग पोर्टलच्या मुखपृष्ठावर जा.
- पेजच्या डाव्या बाजूला लिंक Link Aadhar असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- पॅन नंबर व आधार नंबर लिंक करण्यासाठी १ हजार रुपये शुल्क संदर्भात सूचना या ठिकाणी तुम्हाला दिसेल ती सविस्तर वाचून घ्या.
- तुमचा पॅन नंबर व आधार नंबर दिलेल्या चौकटीत टाका आणि Validate या बटनावर क्लिक करा.
- Validate या बटनावर क्लिक करताच एक सूचना तुम्हाला दिसेल ती सविस्तरपणे वाचून घ्या.
- Continue to pay Through e pay tax या बटनावर क्लिक करा.
- दिलेल्या चौकटीत तुमचा पॅन नंबर टाका पॅन नंबर कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा दिलेल्या चौकटीमध्ये नंबर टाका.
- मोबाईल नंबर टाका आणि Continue या बटनावर क्लिक करा.
- आता एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि continue या बटनावर क्लिक करा. लक्षात ठेवा या ठिकाणी फक्त तीनच वेळेस तुम्ही otp टाकू शकता.
- OTP टाकल्यावर Continue या बटनावर क्लिक करा.
1000 ऑनलाईन पे करण्याची पद्धत
- आता तुमचा मोबाईल नंबर पडताळणी यशस्वीपणे झालेली आहे. Continue करा.
- epay tax चे विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल Income Tax प्रोसिड या बटनावर क्लिक करून पुढे चला.
- Assessment Year मध्ये वर्ष निवडा.
- Type of Payment मध्ये other receipts (500) हा पर्याय निवडा.
- खाली दिलेल्या पर्यायामध्ये Sub type of payment मध्ये fee for delay in linking Pan with Aadhar हा पर्याय निवडा आणि continue या बटनावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला १००० रुपयांच्या आकडा दिसेल त्याला continue करा.
- पेमेंट करण्याचे विविध पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यापैकी कोणताही एक पर्याय वापरून पेमेंट करा.
चलन डाउनलोड करा
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन चलन मिळेल ते डाउनलोड करून घ्या.
- आता परत एकदा लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.
- पॅन नंबर व आधार नंबर टाका. एक सूचना येईल ती वाचून घ्या आणि continue या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर टाका दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि पुढे चला.
- तुमच्या मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि Validate करा. असे करताच तुम्हाला एक संदेश येईल. तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची विनंती करण्यात आली आहे. यासाठी थोडा वेळ लागू शकतो. १ ते २ दिवसांमध्ये तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक झालेले असेल.
हि सर्व प्रोसेस झाल्यावर देखील लिंक होण्यासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही इफिलिंग वेबसाईटवर दिलेय टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता. अशा पद्धतीने तुमची तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी ऑनलाईन पद्धतीने लिंक करू शकता. धन्यवाद.