कंपोस्ट खत निर्मिती कशी केली जाते या संदर्भात या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे तो नक्की बघा जेणे करून तुम्हाला कल्पना येईल कि हे सेंद्रिय खत करण्याची पद्धत कशी आहे.
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काही वर्षानंतर हरित क्रांतीच्या नावाखाली शेतीमध्ये रासायनिक खतांचा व औषधांचा वारेमाप वापर करण्यास सुरु झाला आणि येथूनच खऱ्या अर्थाने शेतीच्या अधोगतीला सुरुवात झाली हे आपणाला खूप उशिरा कळले.
रासायनिक खते व औषधी फवारणीमुळे शेती दिवसेंदिवस दगडासारखी टणक बनत चालली आहे. असाच जर शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर सुरु राहिला तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी शेतीची नांगरणी करण्यासाठी आपल्याला जेसीबीचा उपयोग करावा लागेल.
पूर्वी शेतातील दगडाखाली साप विंचू मोठ्या प्रमाणत आढळून येत होते आज मात्र शेतामध्ये साप आणि विंचवाची संख्या खूप कमी झाली आहे.
ज्या रासायनिक औषधांमुळे साप विंचू सारखे विषारी प्राणी कमी झाले तर त्या औषधांमुळे मानवी आरोग्यावर किती भयंकर परिणाम होईल याची कल्पना न केलेली बरी.
कंपोस्ट खत निर्मिती काळाची गरज
पूर्वी पैसा नव्हता म्हणून उत्पन्न वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आता मात्र शक्यतो अनेक जणाकडे पैसा आहेत त्यामुळे आता सेंद्रिय पदार्थाची मागणी वाढली आहे.
आज आपण या ठिकाणी कंपोस्ट कल्चर वापरून सेंद्रिय खत कशा पद्धतीने तयार केले जाते या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हे तत्त्वज्ञान तर सगळ्यांना माहित आहे पण आता यावर उपाय काय.
पूर्वी शेतीमध्ये उत्पादन कमी जरी असले तरी ती शेती सेंद्रिय पद्धतीने केली जात होती. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर नगण्य होता. सेंद्रिय शेती असल्याने शेतात पिकविलेले पिक देखील चवदार लागत होते आणि यामुळे त्या काळातील आपल्या वडीलधारी माणसांचे आरोग्य देखील निरोगी होते.
बोकड पालन व्यवसाय या तरुणाने मिळवला उत्पन्नाचा मार्ग पहा संपूर्ण माहिती
याचे कारण एकच ते म्हणजे सेंद्रिय शेती होय.
रासायनिक खत व औषधीचे दुष्परिणाम
आधुनिक शेतीच्या नावाखाली जमिनीमध्ये जास्त उत्पादन मिळवण्यासाठी अनेक रसायनांचा वापर करतो.
या ररासायनिकखतांमुळे जमीन नापीक होत चालली आहे एवढेच नव्हे तर मानवी आरोग्यावर त्याचप्रमाणे जनावरांच्या आरोग्यावर खूप मोठा विपरीत परिणाम यामुळे होत आहे.
शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खत व औषधांच्या अतिवापरांमुळे जनावरांसाठी उपलब्ध होणारा चारा वैरण यामधून जनावरांना विषबाधा झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहेत.
म्हणून जनावरांचे आरोग्य तसेच मानवी आरोग्य यांचे महत्त्व लक्षात घेता आपणास सेंद्रिय शेती हि काळजी गरज नसून आरोग्याची गरज आहे असे म्हटले तर अतिशोयोक्ती ठरणार नाही.
कंपोस्ट खत प्रकार
या रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचे ऑरगॅनिक कार्बनचे प्रमाण भरपूर प्रमाणात घटले आहे. औषधांच्या फवारणीमुळे जमिनीतील जिवाणू व गांडूळ मारली जातात व जमिनीची सुपीकता कमी होते. म्हणून आपल्याला या दुष्परिणामांना परिणामांना सामोरे जावे लागत आहे.
कंपोस्ट खत compost fertilizer
सेंद्रिय शेतीमध्ये कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती.
बायोडायनामिक खत.
विविध कल्चरद्वारे कुजविले जाणारे खते.
गांडूळ खत.
खड्डा पद्धतीने कुजविलेले खत
असे अनेक प्रकार पडतात.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून आजही बऱ्याच शेतकरी बांधवांकडे गाई म्हशी असतात, कामासाठी जनावरे असतात, मेंढ्या बकऱ्या असतात. यांच्यापासून शेण मिळते. खड्डा पद्धतीने शेतकरी बांधव हे शेण खत साठवून ठेवतात आणि पावसाळा सुरु होण्यापूर्वी जसेच्या तसे हे शेण खत शेतामध्ये टाकतात.
यामुळे दुष्परिणाम होतो असा कि या शेण खताचे व्यवस्थित विघटन होत नाही परिणामी त्यामध्ये शेणाचे काही गोळे शिल्लक असतात.
कंपोस्ट खतामुळे अळीचे नियंत्रण
शेणाचे विघटन व्यवस्थित न झाल्याने हुमणी अळी त्यामध्ये तयार होते. या न कुजलेल्या शेण खताद्वारे हि हुमणी अळी शेतात प्रवेश करते आणि पिकांच्या मुळावर हल्ला करते यामुळे शेतातील पिके सुकून जातात.
या सुकलेल्या पिकांवर औषधोपचार करण्यासाठी पुन्हा एकदा कृषी केंद्रातून रासायनिक औषधी आणून ड्रीचिंग करावी लागते. अर्थात शेतकऱ्यांच्या खर्चाचे हे चक्र काही केल्या थांबत नाही.
यावर उपाय म्हणून शेणखतामध्ये कल्चर सोडून त्याचे विघटन केले गेले पाहिजे. कल्चरचा उपयोग करून शेणखताचे सेंद्रिय खत कसे तयार केले जाते या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कल्चरद्वारे कुलविले जाणारे खत म्हणजे काय तर बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे वेस्ट डी काम्पोसिंग सारखे जीवाणू कल्चर उपलब्ध आहेत.
जे कल्चर आपण पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याचा कडी कचरा व शेण खतावर फवारणी करून काडी कचऱ्याचे विघटन करू शकतो. याच प्रक्रियेला बायोकल्चर कंपोस्ट किंवा कंपोस्ट कल्चर असे म्हणतात.
कंपोस्ट कल्चर वापरण्याची पद्धत
बाजारातील कोणतेही कल्चर विकत आणा शक्यतो नेटसर्फचे बायोफिट कल्चर घ्या.
चांगला परिणाम येण्यासाठी १ लिटरचे कल्चर १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून हलवून घ्या.
तुमच्याकडे शेणखताचा खट्टा असेल तर त्यामध्ये एका लगडी काडीने खोल भोके पाडून घ्या.
खोल पडलेल्या भोकांमध्ये कल्चरयुक्त पाणी सोडा.
शेण खताचा गड्डा कडी कचऱ्याने झाकून ठेवा त्यावर अधूनमधून पाणी शिंपडत चला.
साधारणपणे चाळीस दिवसानंतर अगदी उत्तम कंपोस्ट खत यामुळे तयार होते.
कल्चर वापरल्याने ज्या ठिकाणी दहा टॅक्टर ट्रॉली शेणखत निघत असेल त्या ठिकाणी उत्तम दर्जाचे ३ ट्रॉलीच्या आसपास कंपोस्ट खत निर्मिती होते म्हणजेच उत्तम पद्धतीने शेणाचे विघटन झाल्याने खत वाहतुकीसाठी लागणारा खर्च देखील कमी होतो. शिवाय हुमणी अळी देखील नियंत्रणात येते.
कल्चर कोणते वापरावे आणि ते कोठे मिळेल
वरती सांगितल्याप्रमाणे कंपोस्ट खत निर्मितीसाठी बरेच waste decomposing culture बाजारात मिळतात. परंतु नेटसर्फ कंपनीचे बायोफीट कल्चर वापरल्यास उत्तम रीजल्ट येतो. Netsurf biofit culture मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वरील कल्चर वापरल्यास उत्तम सेंद्रिय खत निर्मिती होत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अभिप्राय आहे. Netsurf biofit culture चा उपयोग करून शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने सेंद्रिय खत निर्मिती केली आहे हे आपण खालील व्हिडीओ मधून बघू शकता.
कंपोस्ट खत निर्मितीसाठी कल्चर वापरण्याची पद्धत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
ज्यांचे लवकर विघटन होते असे भाजीपाल्यांचे देठ, कडी कचरा गाई म्हशीचे शेण इत्यादीपासून तायर केलेले खत म्हणजे सेंद्रिय खत होय.
सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी कल्चरचा उपयोग केला जातो. बाजारामध्ये हे लिक्विड कल्चर अगदी ९०० ते १००० रुपयांमध्ये १ लिटरमध्ये मिळते. हे लिक्विड पाण्यामध्ये मिसळून ते शेणाच्या खड्ड्यावर किंवा ओल्या कडीकचऱ्यावर मारल्याने त्याचे कंपोस्ट खतामध्ये रुपांतर होते.
कोणतेही उत्तम दर्जाचे कल्चर तुम्ही कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी वापरू शकता. नेटसर्फ या कंपनीचे बायोफिट कल्चर जर वापरले तर उत्तम परिणाम मिळते. टसर्फ या कंपनीचे बायोफिट कल्चर हवे असल्यास संपर्कासाठी लिंक देण्यात आली आहे.