झेरॉक्स शिलाई मशीन अर्ज Xerox shilai mashin application सुरु झाले असून जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
समाज कल्याण विभागाच्या वतीने 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीनसाठी अर्ज सुरु झाले आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत पात्र अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तुम्हाला जर 100 टक्के अनुदानावर व झेरॉक्स मशीन हवे असेल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या.
नवीन योजनेच्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
सध्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालेली आहे अशावेळी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद योजना २०२४ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर शिलाईमशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे जेणे करून ते या योजनेचा लाभ घेवून स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करू शकेल.
जाणून घेवूयात झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन संदर्भातील सविस्तर माहिती.
100 टक्के अनुदानावर या मशीनसाठी अर्ज सुरु झाले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.
जातीचा दाखला.
दिव्यांग प्रमाणपत्र.
आधार कार्ड.
पॅन कार्ड.
रहिवासी दाखला.
ग्रामसभेचा ठराव.
शाळा सोडल्याचा दाखला.
वरील प्रमाणे कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.
झेरॉक्स शिलाई मशीनसाठी लाभार्थी पात्रता
मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. हि योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते.
खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी हि योजना नसून केवळ मागास प्रवर्गातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरु असतात याचाच एक भाग म्हणून हि झेरॉक्स व शिलाई मशीन योजना सुरु करण्यात आली आहे.
कोठे कराल अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समाजकल्याण विभाग कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे.
पिठाची चक्की अर्ज सुरु ९० टक्के मिळणार अनुदान
अर्ज करण्याचा कालावधी
३१ मार्च २०२४ पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या जेणे करून तुम्हाला शिलाई मशीन किंवा झेरॉक्स मशीनचा लाभ मिळेल.