तुम्हाला जर मोफत साडी मिळाली नाही किंवा जी साडी मिळाली असेल त्यामध्ये दोष असेल तर अशावेळी तुम्ही फोन किंवा इमेलकरून तक्रार करू शकता.
वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने राशन दुकानामध्ये ज्या कुटुंबांकडे पिवळे व केशरी राशन कार्ड असेल त्यांना शासनच्या वतीने मोफत साड्या मिळणार आहे mofat sadi yojana.
अनेक जिल्ह्यांमध्ये या साड्या वाटप सुरु आहेत परंतु अजून काही जिल्ह्यांमध्ये अनेक भगिनींना या मोफत साड्या मिळालेल्या नाहीत.
२४ लाख ८० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींना साड्यांचा लाभ मिळाला आहे.
तुम्हाला जर मोफत साडी योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा तुम्हाला जी साडी मिळालेली आहे ती फाटकी असेल किंवा त्यामध्ये इतर काही दोष असेल तर सरळ शासनाकडे या संदर्भात तक्रार करू शकता.
मोफत साडी योजना 2024 रेशनकार्डवर मिळणार साडी mofat sadi yojana
जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
महिलांना दिली जाते ३५५ रुपयांची मोफत साडी
कॅप्टिव्ह मार्केट योजना अंतर्गत दरवर्षी पात्र महिलांना या मोफत साड्या शासनच्या वतीने देण्यात येणार आहे. ३५५ रुपये अधिक जीएसटी अशी या साडीची किंमत असणार आहे. वर्षातून एकवेळेस पात्र महिलांना हि साडी राशन दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागामध्ये या योजेनेसंदर्भात पाहिजे तेवढी जागृती न झाल्याने अनेक महिला भगिनी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे तुम्हाला देखील शासनाच्या या मोफत साडी योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही थेट या संदर्भात तक्रार करू शकता आणि या योजनेचा लाभ घेवू शकता.
साडी मिळाली नाही येथे करा तक्रार
कॅप्टिव्ह मार्केट योजना अंतर्गत पात्र असूनही तुम्हाला मोफत साडी मिळत नसेल तर तुम्ही खालील दिलेल्या फोन नंबरवर किंवा इमेलआयडीवर संपर्क साधू शकता.
संपर्कासाठी इमेल आयडी – info@mspc.org.in
फोन नंबर – 022-27703612
शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात परंतु या योजनेची संपूर्ण माहिती नसल्याने सर्वसामान्य नागरिक अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते.
त्यामुळे तुम्हाला अशा योजनांची माहिती जाणून घेणे खूपच गरजेचे असते. मोफत साडी योजनेची महिला भगिनींमध्ये खूपच उत्सुकता असून आपल्याला हि साडी कधी मिळेल याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. अशावेळी तुम्हाला जर या मोफत साडी योजनेचा लाभ मिळाला नाही तर तुमची निराशा होण्याची शक्यता असते.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून आज पर्यंत १३ लाख १७ हजार साड्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. काही साड्या शिल्लक असून या साड्यांचे देखील त्वरित वितरण करण्याच्या सूचना अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
तुम्ही पात्र असूनहीतुम्हाला मोफत साडी मिळाली नाही तर अशावेळी तुम्ही शासनाने तक्रार करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला फोन नंबर व इमेल आयडीवर संपर्क साधून तुमची रीतसर तक्रार दाखल करू शकता.