शासनाकडून लग्नासाठी मिळणार 25 हजार रुपये अनुदान पहा सविस्तर माहिती.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग सगळीकडे लग्नाची मोठी धूमधाम असते.
लग्नात खर्च देखील मोठ्या प्रमाणत होतो. त्यामुळे अनेकजण सध्या सामुहिक विवाह पद्धतीने लग्न करत आहेत.
तुम्ही किंवा तुमच्या घरातील व्यक्ती सामुहिक विवाह पद्धातीनेज लग्न करण्याच्या तयारीत असाल तर शासनाकडून तुम्हाला आता 25 हजार रुपयांचे वाढीव अनुदान मिळणार आहे.
सामुहिक विवाह किंवा नोंदणीकृत पद्धतीने जे जोडपी लग्न करणार आहेत त्यांना शासनाच्या वतीने 25 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन असा करा online अर्ज
लग्नासाठी मिळणार 25 हजार अनुदानात झाली वाढ
दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
जी जोडपी सामुहिक किंवा नोंदणीकृत पद्धतीने विवाह करतात त्यांना मंगळसूत्र व इतर संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.
हे अनुदान पूर्वी 10 हजार रुपये एवढे होते आता मात्र या अनुदानामध्ये तब्बल 15 हजार रुपयांची वाढ करून एक जोडप्याला 25 हजार एवढे अनुदान मिळणार आहे.
जोडप्यांना तर 25000 रुपये अनुदान मिळेलच परंतु ज्या संस्था अशा प्रकारचे सामुहिक विवाह सोहळे आयोजित करत असतात त्यांना देखील शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते.
स्वयंसेवी संस्थाना पूर्वी 2000 रुपये अनुदान दिले जात होते. आता हे अनुदान 2500 रुपये एवढे करण्यात आले आहे.
अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने म्हणजेच DBT पद्धतीने थेट लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
कागदपत्रे व योजनेच्या अटी
रहिवासी दाखला
१८ वर्ष वय किंवा २१ वर्ष वय पूर्ण असल्याचा दाखला.
1 लाख रुपयांपेक्षा कमी असलेले उत्पनाचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिलेले असावे.
योजनेच्या अटी
वधू महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
ज्या दिवशी विवाह सोहळा पार पडणार आहे त्या दिवशी वधूचे वय १८ वर्षे व वराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. वयाचे प्रमाणपत्र म्हणून शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला सादर करणे गरजेचे ठरणार आहे.
कोठे कराल अर्ज
जिल्हा नियोजन विकास समिती DPDC मार्फत हि योजना राबविण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत योजनेचे नियोजन करण्यात येते व जिल्हा महिला विकास व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करता येतो.
सामुहिक विवाह सोहळा योजना किंवा नोंदणीकृत विवाह योजनेचा जीआर डाउनलोड करा.
सामुहिक विवाह नोंदणीचा जी आर दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी काढण्यात आलेला आहे. यामध्ये आता वरती सांगितल्याप्रमाणे बदल करण्यात आले आहे. अशा पद्धतीने लग्नासाठी मिळणार 25 हजार रुपये अनुदान मिळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना लग्न करणे सोयीचे होणार आहे.
तुम्हाला हा जीआर डाउनलोड करायचा असेल तर खालील बटनावर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय बघू शकता किंवा डाउनलोड करू शकता.