pm vishwkarma scheme status पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि त्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यायची असेल तर ती प्रोसेस किंवा पद्धत कशी आहे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत ३ लाख रुपयांपर्यत विना गॅरंटी कर्ज मिळते शिवाय टूलकीटसाठी 15 हजार रुपये देखील मिळतात.
PM Vishwakarma yojana अनेकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. तुम्ही देखील या योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज केला असेल तर जाणून घ्या तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही.
पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झला आहे किंवा नाही म्हणजेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन कसे तपासावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घेवूयात काय आहे पीएम विश्वकर्मा योजना pm vishwkarma scheme status
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल किंवा कोणत्याही प्रकारातील कारागीर असाल १८ प्रकारच्या पारंपारिक व्यवसायांसाठी संलग्न कारागीर व शिल्पकार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
17 सप्टेंबर 2023 पासून हि योजना सुरु झाली आहे.
कारागिरांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा हा या योजनेचा उद्देश आहे. सदरील योजना अंतर्गत कारागिरांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
शिवाय व्यवसाय प्रशिक्षण सुरु असतांना जितके दिवस प्रशिक्षण असेल तितक्या दिवसासाठी प्रती दिवस 500 रुपये या प्रमाणे स्टायपेंड दिले जाते.
त्यामुळे अनेकांनी या योजनेसाठी अर्ज करणे सुरु केले आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
अशी बघा पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाली किंवा नाही
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत अर्ज केल्यावर त्या अर्जाची सद्यस्थिती कशी तपासावी हे जाणून घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
गुगलमध्ये टाईप करा pm vishwakarma आणि सर्च करा.
https://www.pmvishwakarma.gov.in/ हि वेबसाईट ओपन होईल.
वेबसाईटच्या डाव्या बाजूला 3 अडव्या रेषा दिसतील (नेव्हिगेशन बार) त्यावर टच करा.
सर्वात शेवटी लॉगीन हा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
लॉगीन या पर्यायावर टच करताच अजून काही पर्याय दिसतील त्यामधील लाभार्थी लॉगीन म्हणजेच applicant / beneficiary login या पर्यायावर टच करा.
या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी तुमची नोंदणी केली होती त्यावेळी जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करा आणि कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.
OTP आणि इतर माहिती भरा
तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आता एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि continue या बटनावर टच करा.
आता या ठिकाणी तुम्ही लॉगीन व्हाल. आता या ठिकाणी तुम्हाला बरेच पर्याय दिसतील त्यापैकी applicant status या पर्यायाखाली तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दिसेल.
तुमचा अर्ज जर मंजूर झाला नसेल किंवा प्रतीक्षेत असेल तर Review pending by grampanchayt अशी सूचना या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
अशा पद्धतीने तुमचा पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तपासू शकता pm vishwkarma scheme status.